AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC च्या IPO बद्दल मोठी बातमी! सरकारने उचलले मोठे पाऊल, जाणून घ्या सर्वकाही

मीडिया रिपोर्टनुसार, सरकारला IPO मधून 80,000 कोटी रुपये मिळू शकतात, ज्याचे मूल्य 10-15 लाख कोटी रुपये असू शकते. कोरोना महामारीदरम्यान जगातील पहिल्या 100 विमा कंपन्यांचे एकूण ब्रँड मूल्य 6%ने कमी झाले, तर LIC चे ब्रँड मूल्य 6.8 टक्क्यांनी वाढले.

LIC च्या IPO बद्दल मोठी बातमी! सरकारने उचलले मोठे पाऊल, जाणून घ्या सर्वकाही
आता पॅन एलआयसी पॉलिसीलाही लिंक करावे लागणार
| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 7:53 AM
Share

नवी दिल्लीः एलआयसी आयपीओ (LIC-Life Insurance Corporation of India) संदर्भात केंद्र सरकार पूर्ण तयारीला लागलेय. सरकारने आयपीओसंदर्भात कायदेशीर सल्लागार नियुक्त करण्यासाठी अर्ज (RFP-Request for Proposal) आमंत्रित केलेत. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सरकारला IPO मधून 80,000 कोटी रुपये मिळू शकतात, ज्याचे मूल्य 10-15 लाख कोटी रुपये असू शकते. कोरोना महामारीदरम्यान जगातील पहिल्या 100 विमा कंपन्यांचे एकूण ब्रँड मूल्य 6%ने कमी झाले, तर LIC चे ब्रँड मूल्य 6.8 टक्क्यांनी वाढले.

आता LIC IPO कधी येणार?

एलआयसीच्या आयपीओचे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आयपीओ म्हणून वर्णन केले जाते. सरकारने आयपीओ नियोजन करण्यासाठी गोल्डमॅन सॅक्स ग्रुप इंक, जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेएम फायनान्शियल लि., सिटीग्रुप इंक आणि नोमुरा होल्डिंग्ज इंक यासह एकूण 10 बीआरएलएम कंपन्यांची नियुक्ती केलीय. तज्ज्ञांच्या मते, मूल्यमापनानंतर सरकार आयपीओ घेऊन पुढे जाईल. शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे कागदपत्रे सादर केली जातील.

अॅक्चुरियल कंपनी मिलिमन अॅडव्हायझर्स एलएलपी इंडिया एलआयसीच्या मूल्यांकनावर काम करत आहे. Deloitte आणि SBI Caps ची नियुक्ती पूर्व IPO करार सल्लागार म्हणून करण्यात आलीय. 2022 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत LIC चा IPO आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याची लिस्टिंग करण्याचा सरकारचा मानस आहे.

सरकारने दिली महत्त्वाची माहिती

1956 च्या LIC कायद्यात सुधारणा करण्यात आलीय. IPO साठी मसुदा प्रॉस्पेक्टस देखील लवकरच दाखल केला जाणार आहे. डीआयपीएएम सचिव म्हणाले की, आयपीओसाठी इतर आवश्यकतांचे पालन करण्यासाठी शेअर बाजार नियामक यांच्याशी चर्चा सुरू आहे. मंत्री समिती आता आयपीओशीसंबंधित इतर बाबींवर निर्णय घेणार आहे. जीवन विमा महामंडळ त्याचे मूल्य जास्तीत जास्त वाढवण्यावर काम करत आहे. याशिवाय अंतर्गत कार्यक्षमता आणि उत्पादनांची पुनर्रचना यावरही भर दिला जात आहे.

जगातील सर्वात मोठी विमा कंपनी कोणती?

इटालियन कंपनी पोस्ट इटालियन पहिल्या स्थानावर आहे आणि स्पेनचr मॅपफ्रे दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु एलआयसी चीनच्या पिंगएन इन्शुरन्स आणि दक्षिण कोरियाच्या सॅमसंग लाईफ इन्शुरन्सच्या पुढे आहे, जे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत एलआयसी चिनी, जर्मन, फ्रेंच आणि अमेरिकन कंपन्यांच्या मागे आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत एलआयसी 10 व्या क्रमांकावर आहे आणि तिचे मूल्य 8.65 अब्ज डॉलर्स आहे.

संबंधित बातम्या

आता PF खात्यावर कर लागणार, आपले किती पैसे कापणार? जाणून घ्या…

EPF च्या नियमांमध्ये मोठा बदल, आता नोकरदारांसाठी दोन पीएफ खाती असणार, जाणून घ्या का?

Big news about LIC’s IPO! Big steps taken by the government, know everything

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.