Share Market : गुंतवणूकदारांची लॉटरी; अवघ्या एका तासात कमावले 4 लाख कोटी, हे शअर्स देतायेत जबरदस्त परतावा

ज्या प्रकारे ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात घसरण दिसून आली, ते पाहून शेअर बाजारात पुन्हा एकदा इतक्या लवकर तेजी दिसून येईल असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत नव्हता.

Share Market : गुंतवणूकदारांची लॉटरी; अवघ्या एका तासात कमावले 4 लाख कोटी, हे शअर्स देतायेत जबरदस्त परतावा
Share Market
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 8:19 PM

ज्या प्रकारे ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात घसरण दिसून आली, ते पाहून शेअर बाजारात पुन्हा एकदा इतक्या लवकर तेजी दिसून येईल असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत नव्हता. मात्र गुंतवणूकदार आणि शेअर मार्केट तज्ज्ञांचा अंदाज चुकवत शेअर बाजारानं जोरदार उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. शेअर मार्केटच्या आकड्यांनी नवा विक्रम केला आहे. नियोजित वेळेनुसार मुहूर्ताच्या ट्रेडिंगवर बाजार ओपन झाला, तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये देखील तेजी दिसून आली.

सेन्सेक्स 435 अंकांच्या तेजीसह 79,823 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 111अंकांची वाढ झाली. 111अंकांच्या वाढीसह निफ्टी 24,316 वर पोहोचली. एक तासांच्या मुहूर्त ट्रेडिंगनंतर जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 335 अंकांनी वाढून 79724 वर पोहोचला. तर निफ्टी 94 अंकांनी वाढून 24299 वर पोहोचली. शेअर मार्केटमध्ये आलेल्या या तेजीमुळे बीएसई मार्केटचं कॅपीटल 4 लाख कोटी रुपयांनी वाढलं. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी अवघ्या एका तासात चार लाख कोटी रुपयांची कमाई केली.

या शेअर्समध्ये आली तेजी

जेव्हा बाजार ओपन झाला तेव्हा महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा मोटर्स, एनटीपीसी, बीईएल आणि आयशर मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. या कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीपासूनच टॉपवर होते. शेअर्स मार्केटमध्ये तेजी आल्यानं बीएसई मार्केटचं कॅपीटल 4 लाख कोटी रुपयांनी वाढलं. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी अवघ्या एका तासात चार लाख कोटी रुपयांची कमाई केली.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.