AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

British Debt : इंग्रजांचे हे कर्ज अजूनही फेडतंय सरकार,दरमहा होते इतकी लूट

Indian Government Paying British debt: इंग्रजांचे हे कर्ज आजही भारत सरकार फेडत आहे. जवळपास 200 वर्षां आधी हे कर्ज घेण्यात आले होते. पण त्याचे व्याज आज ही फेडल्या जात आहे. कोणते आहे हे कर्ज, का ते स्वातंत्र्यानंतरही फेडल्या जात आहे?

British Debt : इंग्रजांचे हे कर्ज अजूनही फेडतंय सरकार,दरमहा होते इतकी लूट
ईस्ट इंडिया कंपनीचे कर्ज
| Updated on: Oct 31, 2025 | 4:41 PM
Share

200 वर्षांपूर्वी एक करार झाला होता. हा कर्जाचा करार होता. आता इतके वर्षे उलटूनही भारत सरकारला या कर्जचे व्याज फेडावे लागत आहे. हे कर्ज भारत सरकारने घेतले नव्हते. तर अवधच्या नबाबांशी संबंधित हे प्रकरण आहे. ही कथा वसीका या परंपरेची आहे. इंग्रजांच्या काळात ही आर्थिक परंपरा होती. त्यात आज पण भारत सरकारला हा पैसा फेडावा लागत आहे. काय आहे ही परंपरा, काय आहे तो करार, जाणून घ्या.

कोणते कर्ज फेडत आहे केंद्र सरकार

वसीका हा फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ लिखित करार असा होतो. अवधच्या नवाबाने इंग्रजासोबत हा करार केला. ईस्ट इंडिया कंपनी आणि नवाबामध्ये हा करार झाला होता. या नबाबांनी मोठी कर्जाऊ रक्कम इंग्रजांना दिली होती. या रक्कमेचे व्याज नबाबाचे वंशज आणि त्याच्याशी संबंधित लोक पेन्शन, वसीका रुपात घेतील असा हा करार होता. इतिहासकारांच्या मते ही परंपरा 1817 मध्ये सुरू झाली होती. तेव्हा शुजद्दौला याच्या पत्नीने ईस्ट इंडिया कंपनीला जवळपास चार कोटी रुपये त्यावेळी दिले होते. ही रक्कम त्यावेळी भलीमोठी होती. या कर्जावरील व्याज हे प्रत्येक महिन्याला नबाबांच्या वंशजांना देण्याचे ठरले. इंग्रज दरमहा ही रक्कम नबाबांच्या वंशजांना देत होते. त्यालाच वसीका म्हणत.

सरकारच्या तिजोरीवर मोठा भार

काळ बदलत गेला. 1857 च्या क्रांतीनंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाली आणि 1874 मध्ये ब्रिटीश सरकारने थेट भारतावर प्रशासन लादले. कारभार हाती घेतला. पुढे 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. लोकशाही सरकार अस्तित्वात आले. बीबीसीच्या एका वृत्तानुसार, उत्तर प्रदेश सरकार वसीका अधिकारी एस.पी. तिवारी यांनी 30 लाख रुपयांचा एक फंड कोलकत्ता रिझर्व्ह बँकेत ठेवला. तो पुढे कानपूर आणि नंतर लखनऊ येथील सिंडिकेट बँकेत स्थलांतरीत करण्यात आला. आता या रक्कमेतील जवळपास 26 लाख रुपये व्याज रुपाने मिळतात आणि ते जवळपास 1200 लोकांना वसीका म्हणून वाटप होतात.

काहींना तर केवळ 10 रुपये मिळतो वसीका

आता या कहाणीत एक ट्विस्ट आहे. त्यानुसार वसीकाची रक्कम जवळपास 1200 जणांना मिळते. काही जणांच्या वाट्याला तर अवघे 10 रुपये येतात. हुसैनाबाद ट्रस्ट आणि दुसरा उत्तर प्रदेश सरकारच्या वसीका कार्यालयाकडून ही रक्कम मिळते. इतिहासकार डॉ. रौशन तकी यांच्या मते, नवाब गाजीउद्दीन हैदर आणि त्यांचा मुलगा नसरुद्दीन हैदर यांनी ईस्ट इंडिया कंपनीला हे चार कोटींचे कर्ज परत न घेण्याच्या हमीवर दिले होते. त्यात व्याजाची रक्कम दरमहा त्यांच्या वारसांना देण्याची तरतूद करण्यात आली होती. आता हे आर्थिक उत्तरदायित्व असल्याने कायद्याने ते बंद करता येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....