AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chai Sutta Bar : पठ्ठ्याचं लॉजिक सुपरहिट! गर्ल्स होस्टेलसमोर सुरु केला चहाचा व्यवसाय, आज 150 कोटींची उलाढाल 

Chai Sutta Bar : युपीएससीचे स्वप्न घेऊन आलेला तरुण एका आयडियाने थेट स्टार्टअपचा मालक झाला. आज या स्टार्टअपचा टर्नओव्हर 150 कोटींच्या घरात आहे.

Chai Sutta Bar : पठ्ठ्याचं लॉजिक सुपरहिट! गर्ल्स होस्टेलसमोर सुरु केला चहाचा व्यवसाय, आज 150 कोटींची उलाढाल 
| Updated on: May 14, 2023 | 6:52 PM
Share

नवी दिल्ली : इच्छा तिथे फळ अशी म्हण तुम्ही ऐकली असेलच. युपीएससीचे (UPSC) स्वप्न घेऊन आलेला तरुण एका आयडियाने थेट स्टार्टअपचा मालक झाला. आज या स्टार्टअपचा (Startup) टर्नओव्हर 150 कोटींच्या घरात आहे. पण त्यासाठी त्याला आयडिया सुचली. त्या कल्पनेवर त्याने काम केले. लोकांनी नावं ठेवली, पण त्याच्या मनाने निश्चिय केला होता, त्यानुसार, त्याने मेहनत घेतली. आज या चहाच्या कट्यावर त्याला ज्यांनी नावं ठेवली, ते चहा पिऊन शिळोप्याच्या गप्पा मारतात. तेव्हा प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात, ते या तरुणाने त्याच्या उदाहरणातून दाखवून दिले.

चाय सुट्टा बार अनुभव दुबे (28) आला तर होता युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी, पण त्याला एक कल्पना सुचली. मित्र आनंद नायक सोबत त्याने ‘चाय सुट्टा बार’ हा स्टार्टअप सुरु केला. त्याचे वडील एक व्यावसायिक होते. पण आपला मुलगा व्यावसायिक व्हावा, अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अनुभवला युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली येथे पाठवले. अनुभवच्या डोक्यात मात्र काही तरी बिझिनेस करण्याचा विचार होता. त्याला मित्र आनंद नायकची मदत मिळाली आणि चहाचा कट्टा सुरु झाला.

असा सुरु केला व्यवसाय आनंद नायकच्या घरी कपड्यांचा व्यवसाय होता. पण तो बंद झाला होता. अनुभव कोणता तरी व्यवसाय करु इच्छित असल्याचे आनंदला माहिती होते. आनंदने त्यांचा कपड्याचा व्यवसाय बंद झाल्याची माहिती दिली. दोघांनी मिळून नवीन व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. अनुभवने आई-वडिलांना कसली ही माहिती न देता इंदुर गाठले. अनुभव आणि आनंद कडे 3 लाख रुपयांची बचत होती. अनुभवने चहाच्या स्टार्टअपची आयडिया दिली नी मग दोघांचा हा चहाचा कट्टा जोरदार रंगला. कमी गुंतवणुकीत त्यांना जोरदार परतावा मिळाला.

गर्ल्स होस्टेलसमोर सुरुवात त्यांनी भंवरकुआँमध्ये गर्ल्स होस्टेलसमोर त्यांच्या चाय सुट्टा बारची सुरुवात केली. हे या भागातील कोचिंग सेंटर होते. चहाची दुकान एका मोक्याच्या ठिकाणी होती. तरीही पहिल्या दिवशी त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांचे मित्र मदतीला धावले. हळूहळू विद्यार्थी आणि इतर चहा पिण्यासाठी गर्दी करु लागले.

अशी लढवली आयडिया गर्ल्स होस्टेलसमोर चहाची दुकान सुरु करुनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने हे दोघे पेचात पडले. दोघांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने गर्दी जमवली. या चहाच्या दुकानावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मित्रांची जोरदार बैठक बसली. गर्दी पाहून चहा पिणाऱ्यांची पाऊलं आपोआप या दुकानाकडे वळली. ही आयडिया एकदम जोरात चालली. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी त्याच्या काही मित्रांनी चाय सुट्टा बारची तोंडी जाहिरात सुरु केली. ही कल्पना पण कामी आली. त्यांच्या स्टॉलवर आता चहाच्या दर्दीची अलोट गर्दी उसळली.

परदेशात पण जलवा अनुभव आणि आनंदने 6 महिन्यातच 2 राज्यात चाय सुट्टा बारच्या 4 फ्रँचाईज दिल्या. देशात सध्या त्यांच्या या स्टार्टअपचे 150 आउटलेट आहेत. केवळ देशातच नाही तर परदेशात पण त्यांनी फ्रँचाईज दिल्या आहेत. चाय सुट्टा बारने दुबई, युके, कॅनाडा आणि ओमान या देशापर्यंत मजल मारली आहे. एका अंदाजानुसार या कंपनीची वार्षिक उलाढाल 100-150 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.