Petrol Diesel Price Today : राज्यात पुण्यात आज सर्वात स्वस्त इंधन, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय

Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या दरवाढीला ब्रेक लागल्याने गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. आज पुण्यात सर्वात स्वस्त इंधन मिळत आहे. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय

Petrol Diesel Price Today : राज्यात पुण्यात आज सर्वात स्वस्त इंधन, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 8:29 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती (Crude Oil Price) सध्या स्थिर आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली होती. तेलाचा भाव 90 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहचला होता. ओपेक प्लस या तेल उत्पादक संघटनेने तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान इराकने भारताला 2 डॉलर प्रति बॅरल स्वस्तात इंधन पुरवठा सुरु केला आहे. त्याचा भारताला फायदा होईल. आज सकाळीच पेट्रोलियम कंपन्यांनी भाव जाहीर केले आहे. त्यानुसार, राज्यात पुण्यात सर्वात स्वस्त इंधन आहे. पुण्यात पेट्रोल (Petrol Price) 105.78 रुपये तर डिझेल (Diesel Price) 92.30 रुपये लिटर आहे.

कच्चा तेल वधारले आज 23 एप्रिल रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत फार मोठा उलटफेर झाला नाही. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 77.87डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 81.66 डॉलर प्रति बॅरलवर होते.

इराककडून आवक रशिया पाठोपाठ आता इराण भारताला स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे प्रत्येक बॅरलमागे दोन रुपयांची बजत होत आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.

हे सुद्धा वाचा

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.68 तर डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.15 तर डिझेल 93.66 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.71 पेट्रोल आणि डिझेल 94.17 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.46 आणि डिझेल 92.98 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.06 आणि डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.45 तर डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.72 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.78 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.11 रुपये तर डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.