AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk Twitter : कशी नशीबाने थट्टा आज मांडली, ट्विटरवर संकटाचे ढग

Elon Musk Twitter : ट्विटरवर सध्या संकटाचे ढग जमले आहेत. संकटांची मालिका गेल्या वर्षीपासून सुरुच आहे. आता त्यात मेटाने थ्रेड दिला आहे. हा एकमेव धोका नाही. ट्विटरचे आर्थिक गणित बघिडले आहेत. काय आहे प्रकार

Elon Musk Twitter : कशी नशीबाने थट्टा आज मांडली, ट्विटरवर संकटाचे ढग
| Updated on: Jul 16, 2023 | 4:39 PM
Share

नवी दिल्ली | 16 जुलै 2023 : ट्विटरवर सध्या संकटांचे ढग जमले आहे. गेल्या वर्षीपासून ट्विटरवर संकटांची (Twitter in Trouble) मालिका सुरु होती. त्यात मेटाने थ्रेड आणल्याने आता ट्विटरच्या टिवटिवला खुले आव्हान मिळाले आहे. या संकटाची चाहुल एलॉन मस्क (Elon Musk) याला अगोदरच लागली होती. त्यामुळे त्याने त्याचे दुःख आता सार्वजनिक केलं आहे. एक तर ट्विटरच खरेदीचा अट्टहास त्याला महागात पडला आहे. त्यानंतर त्याने केलेल्या बदलाचा मोठा फटका ट्विटरला सहन करावा लागला. अनेक कार्यालयांना कुलूप लागले. तर काही ठिकाणी फर्निचर, खुर्च्या पण विकण्याची वेळ आली. आता ट्विटरचा आर्थिक भार कसा सहन करायचा असा सवाल मस्क समोर उभा ठाकला आहे.

ताळेबंद बिघडला

एलॉन मस्कने गेल्यावर्षी ट्विटरची खरेदी केली. त्यासाठी 44 अब्ज डॉलर खर्च करण्यात आले. मस्क याला हा सौदा महागात पडला. पैसा कमाविण्यासाठी त्याने युझर्सकडून वसुली सुरु केली. युझर्सला ही बाब आवडली नाही. अनेक युझर्सने ट्विटरकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली. आता खर्चात कपात करुनही ट्विटरचा ताळेबंद, (बँलेन्स शीट) बिघडला आहे. मस्कने याविषयीची माहिती दिली.

जाहिरातीची कमाई घटली

जाहिरातीतून होणारी कमाई घटली आहे. ट्विटरला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. मस्कने यासंबंधीची माहिती दिली. त्यानुसार जाहिरातींचा महसूल घटला आहे. हा महसूल 50 टक्के खाली आला आहे. तसेच खेळते भांडवल कमी झाले आहे. पैशांचा ओघ आटत आहे. त्यामुळे एलॉन मस्क सध्या चिंतेत आहे.

जाहिरातदारांनी फिरवली पाठ

ट्विटर खरेदीसाठी मस्कने 44 अब्ज डॉलर खर्च केले होते. त्याने मोठ्या जाहिरातदारांना बदलांचे आणि त्यातून मोठ्या कमाईचे आश्वासन दिले होते. पण मस्कने निरंकुशपणे, दबावतंत्राने सर्व घडी विस्कटून टाकली. चांगले उच्च अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला. तर काही कर्मचाऱ्यांनी सामुहिकपणे राजीनामे दिले. त्यामुळे जाहिरातदारांनी हात आखडता घेतला. मोठ्या जाहिरातदारांनी ट्विटरकडे पाठ फिरवली.

थ्रेडचे संकट

आता मेटाने ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड उतरवले आहे. या सोशल एपने अवघ्या दोन दिवसांत डाऊनलोडचे सर्व रेकॉर्ड मोडले. अजून प्राथमिक अवस्थेत असणारे हे एप युझर्सच्या पसंतीला उतरले आहेत. अनेक फीचर ट्विटरसारखेच असल्याने पेच वाढला आहे. ट्विटरने मेटाला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. तर मेटा काही मागे हटण्यास तयार नाही.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.