AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk Networth : जगाची तोंडात बोटं, एलॉन मस्क याने खोऱ्याने जमवली माया, तोडले सर्व रेकॉर्ड, पैशांचा बदाबदा पडला पाऊस

Blumberg Billionaire Index : गेल्या आठवड्यात एलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत 100 अब्ज डॉलरहून अधिकची वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसात त्याच्या संपत्तीत 31 अब्ज डॉलरची भर पडली आहे. 17 डिसेंबर रोजी जगातील धनाढ्याच्या संपत्तीत 12 अब्ज डॉलरची भर पडली. 500 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला 14 अब्ज डॉलरची गरज आहे.

Elon Musk Networth : जगाची तोंडात बोटं, एलॉन मस्क याने खोऱ्याने जमवली माया, तोडले सर्व रेकॉर्ड, पैशांचा बदाबदा पडला पाऊस
एलॉन मस्क याची संपत्ती
| Updated on: Dec 18, 2024 | 12:16 PM
Share

एलॉन मस्क याच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात त्याच्या एकूण संपत्तीत 100 अब्ज डॉलरहून अधिकची वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसात त्याच्या संपत्तीत 31 अब्ज डॉलरची भर पडली आहे. 17 डिसेंबर रोजी जगातील धनाढ्याच्या संपत्तीत 12 अब्ज डॉलरची भर पडली. 500 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला 14 अब्ज डॉलरची गरज आहे. ट्रम्प विजयी झाल्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्याच्या संपत्तीत 89 अब्ज डॉलरची भर पडली आहे.

लवकरच 500 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये

एलॉन मस्क हा संपत्तीत सातत्याने विक्रमावर विक्रम करत आहे. एलॉन मस्क हा लवकरच 500 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्याला शेअर बाजारातील एका मोठ्या तेजीची गरज आहे. आज केंद्रीय बँक फेड रिझर्व्हच्या निर्णयानंतर ही तेजी दिसू शकते. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, एलॉन मस्क याच्या संपत्तीत मोठी वृद्धी झाली आहे. लवकरच तो नव्या विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे.

संपत्तीत असा उंचावला आलेख

जगातील सर्वात श्रीमंत आणि बडा उद्योजक एलॉन मस्क यांच्या संपत्तीचा आलेख दिवसागणिक उंचावत आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यात खंड पडलेला नाही. या 17 डिसेंबर रोजी त्याच्या एकूण संपत्तीत 12 अब्ज डॉलरची भर पडली. त्याची एकूण संपत्ती आता 486 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. या वर्षात त्याच्या संपत्तीत 257 अब्ज डॉलरची भर पडली. याचा अर्थ त्याच्या संपत्तीत 112.4 टक्क्यांची वाढ झाली. जगातील दुसर्‍या क्रमांकाचे अब्जाधीश जेफ बेजोस यांची संपत्ती 250 अब्ज डॉलरच्या घरात आहे. मस्क आणि बेजोस यांच्या संपत्तीत मोठे अंतर आले आहे.

एका आठवड्यात 100 अब्ज डॉलरहून अधिकचा फायदा

जर गेल्या आठवड्याचा विचार केला तर एलॉन मस्क यांच्या संपत्तीत 100 अब्ज डॉलरहून अधिकची भर पडली. एका आठवड्यापूर्वी 12 डिसेंबर रोजी मस्क याची संपत्ती 384 अब्ज डॉलर इतकी होती. त्यात तेव्हापासून आतापर्यंत 102 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. 11 डिसेंबर रोजी स्पेसएक्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्याने त्याच्या संपत्तीत मोठी वाढ दिसून आली. त्याच्या संपत्तीत 45 अब्ज डॉलरची वाढ झाली. टेस्लाच्या शेअरमध्ये तेजी आल्याने त्याला 22 अब्ज डॉलरचा फायदा झाला. एका दिवसापूर्वी 16 रोजी एलॉन मस्क याच्या संपत्तीत 19 अब्ज डॉलरची वाढ झाली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.