AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही मिनिटात EPF चा पैसा खात्यात! UPI मधून असा काढा पीएफ, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या प्रक्रिया

PF Withdrawal Via UPI : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच देशातील कोट्यवधी ग्राहकांना एक नवीन सुविधा देणार आहे. ईपीएफ सब्सक्राईबर्स केवळ ATM च नाही UPI च्या माध्यमातून पीएफ काढू शकतील. इतकी सोपी आहे प्रक्रिया...

काही मिनिटात EPF चा पैसा खात्यात! UPI मधून असा काढा पीएफ, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या प्रक्रिया
ईपीएफओ सोप्या पद्धतीने काढा पीएफImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 03, 2025 | 9:46 PM
Share

केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील कोट्यवधी ग्राहकांसाठी आनंदवार्ता आणली आहे. कर्मचार्‍यांना लवकरच ATM मधून पैसे काढता येणार आहे. ही सुविधा दृष्टीटप्प्यात असतानाच आता अजून एक खुशखबर आली आहे. ईपीएफ सब्सक्राईबर्स केवळ ATM च नाही UPI च्या माध्यमातून पीएफ काढू शकतील. ग्राहक Paytm, GPay, PhonePe ॲपवरून पीएफ रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरीत करू शकतील. या सुविधेचा देशातील कोट्यवधी कर्मचारी, सदस्यांना फायदा होईल.

काय आहे योजना?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओने युपीआय इंटिग्रेशनसाठी एक योजना तयार केली आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे एटीएमच्या माध्यमातून पीएफची रक्कम काढण्यासोबतच युपीआयच्या माध्यमातून ही रक्कम काढण्याची सुविधा मिळेल. त्यामुळे पीएफ काढण्यासाठी सध्या जो कालावधी लागतो. तो अगदी काही मिनिटांवर येणार आहे.

कशी काढणार UPI मधून रक्कम?

युपीआय Paytm, GPay, PhonePe ॲपमधून पीएफची रक्कम काढण्याची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही. पण ही रक्कम काढण्याची अथवा बँक खात्यात हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सोपी असेल. तुम्ही Paytm, GPay, PhonePe ॲप अगोदरच वापरत असाल ही प्रक्रिया सोपी होईल. नसेल तर हे ॲप डाऊनलोड करा. तुम्ही युपीआय ॲप उघडल्यावर तुम्हाला ‘EPFO Withdrawal’ हा पर्याय शोधावा लागेल.

अद्याप हा पर्याय सुरू न झाल्याने तो युपीआय ॲपमध्ये सध्या दिसणार नाही. जसा हा पर्याय सुरू होईल. तुम्हाला तो या ॲपमध्ये दिसेल. या पर्यायमध्ये ईपीएफओ सदस्याला UAN क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर किती रक्कम काढायची, ती रक्कम नोंदवा. वैद्यकीय गरज, घराचे बांधकाम, लग्न वा इतर खर्चासाठी नियमानुसार जितकी रक्कम हवी तितकी टाकावी लागेल.

त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. OTP टाकल्यावर पीएफचा पैसा लागलीच तुमच्या बँक खात्यावर जमा होईल. अथवा तुमच्या डिजिटल खात्यात सुद्धा ही रक्कम जमा होईल. डिजिटल वॉलेटमध्ये रक्कम दिसेल.

ekyc प्रक्रिया पूर्ण करा

PF मधून पैसे काढण्यासाठी पीएफ खात्याचे केवायसी पूर्ण करावे लागेल. केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार, PAN आणि बँक खात्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली की नाही हे ऑनलाईन तपासता येईल. त्यासाठी तुम्हाला ईपीएफओची अधिकृत साईट epfindia.gov.in वर जाऊन खात्यात लॉगिन करावे लागेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.