EPFO Rule : तुमची कंपनी पीएफ खात्यात देते कमी योगदान? एका क्लिकवर असे तपासा
EPFO हे कर्मचाऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक हितसंबंध जपते. कर्मचारी आणि कंपनीकडून दरमहा रक्कम, योगदान ईपीएफ खात्यात जमा होते. त्याआधारे पुढे कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होता. पण कंपनी पीएफ खात्यात कमी योगदान देत असेल तर?

Employer Contribute Less Towards PF Account? : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) अंतर्गत योगदानाचे व्यवस्थापन होते. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती निधीची तरतूद करण्यात येते. ईपीएओफच्या नियमानुसार, 20 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक कंपनी, आस्थापनेला ईपीएफ योजनेतंर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. EPFO हे कर्मचाऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक हितसंबंध जपते. कर्मचारी आणि कंपनीकडून दरमहा रक्कम, योगदान ईपीएफ खात्यात जमा होते. पण कंपनी पीएफ खात्यात कमी योगदान देत असेल तर?
कंपनी-कर्मचाऱ्यांचे योगदान
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी ईपीएफमध्ये कर्मचारी आणि कंपनी या दोघांनाही दरमहा योदान देणे बंधनकारक आहे. निवृत्तीनंतर पीएफ खात्यातील रक्कम काढता येते. तर अटी आणि शर्तींवर EPF खात्यातून अंशतः रक्कम काढण्यास परवानगी आहे. सरकार वेळोवेळी ईपीएफवरील व्याजदराबाबत निर्णय घेते. आर्थिक वर्ष 2024-25 साठी सरकारने 8.25 टक्के व्याज दर निश्चित केला आहे.
दोघांचे समसमान योगदान
ईपीएफओच्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा होते. इतकीच रक्कम कंपनी सुद्धा पीएफ खात्यात जमा करते. पण पगार पत्रकात जर कंपनी, मालक, नियोक्ता यांच्याकडून भविष्य निर्वाह निधी खात्यात तुमच्या योगदानापेक्षा खूपच कमी योगदान येत असेल तर त्याची तपासणी कर्मचाऱ्याला करता येते. तसेच याविषयीची तक्रार सुद्धा करता येते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यात तीन विविध योजना आहेत. त्यामध्ये निवृत्ती योजना, कर्मचारी पेन्शन योजना आणि EDLI या विमा योजनेचा समावेश आहे. कंपनीचे योगदान विभागले जाते. कंपनी कर्मचाऱ्याच्या खात्यात त्याचे 8.33 टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत EPS तर 3.67 टक्के रक्कम ही EPF मध्ये जमा होते.
पासबुकची करा तपासणी
जर तुम्हाला कंपनी तुमच्या पीएफ खात्यात कमी रक्कम जमा करत असल्याचे वाटत असले तेव्हा तुम्ही थेट पासबुक तपासू शकतात. यामध्ये कंपनी पीएफ खात्यात किती योगदान जमा करते याची माहिती समोर येते. पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली हे पाहाता येते. ईपीएफ योगदानात जर तफावत आढळली तरी त्याविषयीची तक्रार सुद्धा करता येते.
Passbook Lite सुविधा
EPFO ने आपल्या सदस्य पोर्टलमध्ये नवीन सुविधा ‘Passbook Lite’ सुरू केली आहे. या माध्यमातून सदस्य त्यांच्या EPF खात्याची थोडक्यात माहिती मिळवू शकतील. सदस्य Passbook Lite सुविधेचा लाभ EPFO सदस्य पोर्टल unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ यावरून घेऊ शकतील. ही लिंक थेट पोर्टलवर पोहचवते. याठिकाणी सदस्यांना त्यांच्या EPF ची माहिती सहज उपलब्ध होते.
पासबुकमध्ये काय मिळते माहिती
कर्मचाऱ्याला पासबुकमध्ये अनेक सुविधांची माहिती मिळते. कर्मचाऱ्याच्या खात्यात किती रक्कम आहे. यापूर्वी त्याने किती रक्कम कधी काढली याची माहिती मिळते. तुम्ही पीएफ पासबुक घरबसल्या काही सोप्या स्टेप फॉलो करुन पाहु शकता. यामध्ये उमंगचा मोठा फायदा होतो.
असे करा ई-पासबुक डाऊनलोड
उमंग एप उघडा, ईपीएफओ सर्च करा
आता व्ह्य पासबुक पर्यायवर क्लिक करा
त्यानंतर युएएन क्रमांक टाका
मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येईल. तो सबमिट करा
सदस्य आयडी निवडा. ई-पासबुक डाऊनलोड करा
