भारताला 7 हजार कोटींची मदत करणाऱ्या उद्योजकानं एलन मस्कला क्रिप्टोकरन्सीवरुन खडसावलं, म्हणाला…

भारताला 7 हजार कोटींची मदत करणाऱ्या उद्योजकानं एलन मस्कला क्रिप्टोकरन्सीवरुन खडसावलं आहे. Elon Musk and Butrein

भारताला 7 हजार कोटींची मदत करणाऱ्या उद्योजकानं एलन मस्कला क्रिप्टोकरन्सीवरुन खडसावलं, म्हणाला...
एलन मस्क आणि बटरीन

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोरन्सी खूप चर्चेत आहे. जगातील प्रमुख उद्योजक एलन मस्क यानं ट्विट करुन बिटकॉईन ही क्रिप्टोकरन्सी स्वीकारली जाणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर बिटकाईनच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. एलन मस्क यांना क्रिप्टोकरन्सीमधील बादशाह मानलं जाऊ लागलं आहे. मस्क यांच्या ट्विटनंतर बिटकॉईन, डोजिकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात चढ उतार पाहायला मिळाले. क्रिप्टोकरन्सी Ethereum चे सह संस्थापक विटालिक बटरीन यांनी एलन मस्कला खडसावलं आहे. दरवेळी तुमची मनमानी चालणार नाही, तुम्ही क्रिप्टोकरन्सीला प्रभावित करु शकत नाही, अस सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. (Ethereum co founder Vitalik Buterin says Elon Musk will not all time influence crypto market )

विटालिक बटरीन यांची भारताला मदत

विटालिक बटरीन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भारतातील कोरोनाच्या लढाईसाठी ७ हजार कोटी रुपयांचं मूल्य असलेली क्रिप्टोकरन्सी दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळपासून विटालिक बटरीन चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एलन मस्क डोजिकॉईन या क्रिप्टोकरन्सीला पाठिंबा देत आहेत. यामागे त्यांच्या काही वाईट हेतू असेल, असं वाटत नाही, पण ते जास्त काळापर्यंत क्रिप्टोकरन्सीला प्रभावित करु शकत नाहीत, असं बटरीन म्हणले. बटरीन यांच्या इथेरियमचं मूल्य 3000 अमेरिकन डॉलर इतक होते, त्यावेळी ते अब्जाधीशांच्या यादीत पोहोचले होते.सध्या त्यांच्या क्रिप्टोकरन्सीचं मूल्य 2450 डॉलरवर आलेलं आहे. त्यामुळे बटरीन आता अब्जाधीश राहिलेले नाहीत.

एलन मस्क यांचं ट्विट आणि बिटकॉईनला फटका

गेल्या आठवड्यात एलन मस्क यांनी पर्यावरणाच्या मुद्यावरुन बिटकॉईनचा वापर कार खरेदी करताना ग्राह्य धरला जाणार नाही, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर बिटकॉईनची किमंत मोठ्या प्रमाणावर घसरली होती. एलन मस्क यांनी अवघ्या तीन महिन्याचा काळात त्यांचा निर्णय फिरवला. यामुळे बिटकॉईनला मोठनुकसान सहन करावं लागलं होतं.

एलन मस्क यांच्यामुळे यापूर्वी बिटकाईनमध्ये 14 टक्के वाढ

एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं बिटकॉईनचा वापर करुन कार खरेदी करता येईल, अशी घोषणा 8 फेब्रुवारीला केली होती. त्यावेळी बिटकॉईनच्या भावात 14 टक्के वाढ झाली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या ट्रेजरी फंडमध्ये 1.5 अब्ज डॉलर बिटकॉईन ठेवेल, असं म्हटलं होतं.

संबंधित बातम्या:

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताय, कोरोना काळात ‘या’ कंपनीत गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडलेत

Tesla ची कार खरेदी करण्यासाठी पैसे नको Bitcoin द्या; एका Bitcoin ची किंमत माहितीय?

(Ethereum co founder Vitalik Buterin says Elon Musk will not all time influence crypto market )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI