AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरदारांसाठी खुशखबर, पीएफवरील व्याजदरात वाढ

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफच्या व्याजदरात 0.10 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. यामुळे 2018-19 या आर्थिक वर्षातील पीएफवरील व्याजदर 8.55 टक्क्यांवरून 8.65 टक्के झाला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला अर्थमंत्रालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. यामुळे सर्व नोकरदार वर्गाला यंदाच्या वर्षीपासून पीएफच्या रक्कमेवर वाढीव व्याज मिळणार आहे. पीएफच्या व्याज दरात चालू आर्थिक वर्षात वाढ […]

नोकरदारांसाठी खुशखबर, पीएफवरील व्याजदरात वाढ
या गाईडलाईन्स पैसे घेणे आणि देण्यासंबंधी तयार करण्यात आल्या आहेत. ज्याने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM
Share

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफच्या व्याजदरात 0.10 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. यामुळे 2018-19 या आर्थिक वर्षातील पीएफवरील व्याजदर 8.55 टक्क्यांवरून 8.65 टक्के झाला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला अर्थमंत्रालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. यामुळे सर्व नोकरदार वर्गाला यंदाच्या वर्षीपासून पीएफच्या रक्कमेवर वाढीव व्याज मिळणार आहे.

पीएफच्या व्याज दरात चालू आर्थिक वर्षात वाढ करण्यात यावी याबाबत नुकतेच ईपीएफओ आणि इतर विभागातंर्गत बैठक आयोजित केली होती. यावेळी पीएफमध्ये वाढ करण्याच्या निर्णयावर सर्व अधिकाऱ्यांचे एकमत झाले. यानुसार अर्थ मंत्रालयातंर्गत येणाऱ्या आर्थिक सेवा विभागातील 2018-19 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओच्या सदस्यांना 8.65 टक्के व्याजदरास परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या 3 वर्षात पीएफच्या व्याजदरात प्रथमच वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा 6 कोटी नोकरदारांना होणार आहे.

दरम्यान, या बैठकीत किमान पेन्शनच्या रकमेत दुपटीने वाढ करुन ती 2 हजार करण्याच्या प्रस्तावावर मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. मे महिन्यात  होणाऱ्या बैठकीत पेन्शनच्या रक्कमेबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच किमान पेन्शनची रक्कम दुप्पट केल्यास 3000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करावी लागेल. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या परवानगीनंतरच या निर्णयावर अंमलबजावणी केली जाईल.

गेल्या 5 वर्षातील पीएफ दर

2013-14 आणि 2014-15 या दोन्ही आर्थिक वर्षात पीएफवर 8.75 टक्के व्याजदर देण्यात येत होता. त्यानंतर 2015-16 या आर्थिक वर्षात पीएफमध्ये कपात करत 8.8 टक्के व्याजदर देण्यात आला. त्यानंतर 2016-17 या वर्षात पीएफच्या व्याजदरात वाढ करत तो 8.65 टक्के केला गेला आणि गेल्यावर्षी म्हणजेच 2017-18 या वर्षात पीएफच्या रक्कमेवर 8.55 टक्के व्याज देण्यात आला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.