AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीमंतांच्या जगात भारताचा डंका! Forbes च्या यादीत नवीन 24 चेहरे, अंबानी-अदानीच नाही, ही नावं वाचून व्हाल दंग

Forbes Billionaire 2026: यंदा भारीतय अब्जाधीशांच्या संख्येने नवीन रेकॉर्ड केला आहे. गेल्या वर्षी देशात 205 अब्जाधीश होते. तर यंदा ही संख्या वाढून 229 इतकी झाली आहे. या यादीत 24 नवीन चेहऱ्यांची भर पडली आहे.

श्रीमंतांच्या जगात भारताचा डंका! Forbes च्या यादीत नवीन 24 चेहरे, अंबानी-अदानीच नाही, ही नावं वाचून व्हाल दंग
Forbes Billionaire 2026Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 20, 2026 | 3:26 PM
Share

Forbes Billionaire 2026: हे वर्ष उद्योजकांसाठी चांगले राहिले. फोर्ब्स वर्ल्ड्स बिलियनेयर्स 2026 च्या ताज्या यादीत मोठा उलटफेर झाला. देशात आर्थिक आघाडीवर अनेक धोरणात्मक परिणाम झाले. पण तरीही भारताने अब्जाधिशांच्या यादीत डंका वाजवला. श्रीमंतांच्या यादीत यंदा अब्जाधीशांची संख्या वाढली आहे. याविषयीचा नवीन रेकॉर्ड भारताने केला आहे. गेल्या वर्षी देशात 205 अब्जाधीश होते. तर यंदा ही संख्या वाढून 229 इतकी झाली आहे. या यादीत 24 नवीन चेहऱ्यांची भर पडली आहे. शेअर बाजारातही नवीन कंपन्या सूचीबद्ध झाल्या आहेत.

कोण आहे सर्वात श्रीमंत?

भारतात मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात 12% वाढ झाली. भारतातच नाही तर ते आशियातील सर्वात शक्तिशाली आणि श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. ते 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाले आहे. त्यांची एकूण संपत्ती 99.7 अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे. त्यानंतर या यादीत गौतम अदानी यांचा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती 63.8 अब्ज डॉलर आहे. या दोन्ही दिग्गजांनी गेल्या एका वर्षात जवळपास 14.7 अब्ज डॉलरची कमाई केली. भारतीय औद्योगिक क्षेत्रात दोघांची मजबूत पकड दिसून आली. त्यांच्यानंतरही अनेक भारतीयांनी श्रीमंतांच्या यादीत झेंडा रोवला आहे.

महिलांनी मारली बाजी

या वर्षी या यादीत महिला उद्योगपतींनी सुद्धा गरूड भरारी घेतली आहे. ओ.पी. जिंदल प्रमुख सावित्री जिंदल यांनी यादीत आघाडी घेतली आहे. त्या भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशातील 20 महिला अब्जाधीशांच्या समूहाने उद्योग क्षेत्रात नाव काढले आहे. सावित्री जिंदल यांनी स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांना मागे टाकले आहे. त्यांची कंपनी आर्सेलर मित्तल यांच्या शेअरमध्ये 80% उसळी दिसून आली. त्यांच्या संपत्तीत 61% वाढ होऊन ती 31 अब्ज डॉलरवर पोहचली. अनेक महिला उद्योजिका तयार होत असल्याचे समोर येत आहे.

टॉप 10 भारतीय श्रीमंत

1 मुकेश अंबानी

2 गौतम अदानी

3 सावित्री जिंदल

4 लक्ष्मी मित्तल

5 शिव नादर

6 सायरस पूनावाला

7 दिलीप सांघवी

8 कुमार बिर्ला

9 राधाकिशन दमानी

10 उदय कोटक

Follow Us
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.