जेनेरिक मेडिकल सुरु कराल तर होईल लाखोंची कमाई, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

सामान्य आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तील कमी खर्चात उपचार मिळावा या उद्देशातून जेनेरिक औषधांची निर्मीती झाली. (generic medical store income details)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:08 PM, 7 Mar 2021
जेनेरिक मेडिकल सुरु कराल तर होईल लाखोंची कमाई, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सांकेतिक फोटो

मुंंबई : सामान्य माणसाला उपचारासाठी माफक आणि कमी दरात औषधं मिळावीत म्हणून केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान जेनेरिक औषधी योजना (Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana) सुरु केली. या योजने अंतर्गत देशात आरोग्य विश्वात मोठी क्रांती झाली. सामान्य आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला कमी खर्चात उपचार मिळावा या उद्देशातून जेनेरिक औषधांची (generic medical store) निर्मीती झाली. आज म्हणजेच 7 मार्च हा दिवस देशभरात ‘जेनेरिक औषधी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय. या निमित्ताने जाणून घेऊया जेनेरिक औषध म्हणजे नेमकं काय आहे?,

सामान्यांची आतापर्यंत 3600 कोटींची बचत

जेनेरिक औषधं घेतल्यामुळे आतापर्यंत देशात नागरिकांचे एकूण 3600 कोटी रुपये वाचले आहेत. ही आकडेवारी चालू आर्थिक वर्षाच्या 4 मार्चपर्यंतची आहे. देशात जेनेरिक औषधांच्या बाबतीत जागरुकता निर्माण करण्यासाठी 1 मार्च ते 7 मार्च हा आठवडा ‘जेनेरिक औषधी आठवडा’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळच्या जेनेरिक औषधी आढवड्याची थीम ही ‘सेवा दिवस आणि रोजगार’ हीआहे. 7 मार्च हा दिवस जेनेरिक औषधी दिवस म्हणून साजरा केला जातो.

जेनेरिक औषधीच्या माध्यमातून  रोजगाराच्या संधी कशा निर्माण होणार?

जेनेरिक औषधींचा प्रचार करण्यामागे उपचार आणि रोजगार निर्मीती असा दुहेरी उद्देश केंद्र सरकारचा आहे. जेनेरिक मेडिलकच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना रोगजार मिळाललेला आहे. तसेच जेनेरिक औषधी या सामान्य औषधीच्या तुलनेत तब्बल 90 टक्क्यांनी स्वस्त असतात. त्यामुळे गरीब आणि सामान्य वर्गाचे आरोग्यविषयक प्रश्नही तत्काळ सुटत आहेत.

तुम्हीही खोलू शकता जेनेरिक मेडिकल

तुम्ही रोजगाराच्या शोधात असाल तर जेनेरिक मेडिकल सुरु करणे हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. जेनेरिक मेडिकल चालू करण्यासाठी केंद्र सरकारने तीन प्रकारचे वर्गीकरण केले आहे. यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये एखादी व्यक्ती बेरोजगार किंवा बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर किंवा नोंदणीकृत मेडिकल प्रॅक्टिशनर असेल, तर त्यांना जेनेरिक मेडिकल सुरु करता येते.

दरऱ्या कॅटेगिरिमध्ये एखादे ट्रस्ट, एनजीओ, खासगी रुग्णालय, सोसायटी सेल्फ हेल्प ग्रुप यांनासुद्धा जेनेरिक मेडिकल सुरु करता येईल.

तिसर्‍या प्रकारात राज्य सरकारकडून नामनिर्देशित एजन्सी असतील. पंतप्रधान जेनेरिक औषधी केंद्राच्या नावाने हे मेडिकल्स सुरु केले जातात.

जेनेरिक मेडिकल सुरु करण्यासाठी हा फॉर्म डाऊनलोड करा

जेनेरिक मेडिकल सुरु करायचे असेल तर रिटेल ड्रग्स सेल्स विभागाचा परवाना असणे बंधनकारक आहे. हा परवाना जेनेरिक मेडिकलच्या नावाने काढावा लागतो. त्यासाठी http://janaushadhi.gov.in/online_registration.aspx या लिंकवर जाऊन परवान्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करता येऊ शकतो.

कमाई कशी होणार?

जेनेरिक मेडिकल स्टोअर सुरु करायचे असेल तर 2.50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा पूर्ण खर्च सरकारतर्फे दिला जातो. जेनेरिक औषधांच्या विक्रीवर 20 टक्के कमिशन मिळते. त्यानंतर प्रत्येक महिन्यात औषधांची जेवढी विक्री झाली, त्याच्या 15 टक्के वेगळा प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो. हा प्रोत्साहन पर भत्ता जास्तीत जास्त 10 हजार रुपये असेल. नक्षलग्रस्त तसेच नॉर्थ इस्टमधील राज्यांसाठी हा प्रोत्साहनपर भत्ता 15 हजार रुपये प्रती महिना आहे. हा प्रोत्साहनपर भत्ता 2.5 लाख रुपये पूर्ण होईपर्यंत मिळत राहील.

इतर बातम्या :

UPSC न देता थेट जॉईंट सेक्रटरी व्हा, सरकारचं नोटीफिकेशन, अनेकांचा विरोध, काय आहे ही लॅटरल एन्ट्रीची भानगड? वाचा सविस्तर

Recruitment 2021 : ‘या’ मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची नामी संधी; अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस