UPSC न देता थेट जॉईंट सेक्रटरी व्हा, सरकारचं नोटीफिकेशन, अनेकांचा विरोध, काय आहे ही लॅटरल एन्ट्रीची भानगड? वाचा सविस्तर

लॅटरल एन्ट्री हा शब्द सध्या अधिकारी होऊ पहाणाऱ्या आणि खासगी कंपनीत (Marathi report on UPSC lateral Entry) काम करणाऱ्या तसच राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात चर्चिला जातो.

UPSC न देता थेट जॉईंट सेक्रटरी व्हा, सरकारचं नोटीफिकेशन, अनेकांचा विरोध, काय आहे ही लॅटरल एन्ट्रीची भानगड? वाचा सविस्तर
UPSC

UPSC Lateral Entry : लॅटरल एन्ट्री हा शब्द सध्या अधिकारी होऊ पहाणाऱ्या आणि खासगी कंपनीत (Marathi report on UPSC lateral Entry) काम करणाऱ्या तसच राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात चर्चिला जातो आहे आणि त्याला कारण आहे ते अलिकडेच UPSC ने जारी केलेलं एक नोटीफिकेशन. ह्या नोटीफिकेशनच्या माध्यमातून मागच्या दाराने थेट सुपर क्लास वन अधिकारी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. (Govt issues notification for UPSC lateral entry)

काय आहे लॅटरल एन्ट्री?

IAS,IPS सह अनेक सुपरक्लासवन पदासाठी UPSC दरवर्षी परिक्षांचं आयोजन करते. तीन टप्यात ही परिक्षा पार पडते आणि देशाला पॉवरफुल अधिकारी मिळतात. ही स्पर्धात्मक परिक्षा असून ब्रिटीश काळापासून केंद्र आणि राज्यासाठी अधिकारी याच पद्धतीतून निवडले जातात. पण UPA च्या काळात 5 ऑगस्ट 2006 प्रशासकिय सुधार आयोगाची घोषणा केली गेली. त्यांनी जो रिपोर्ट दिला त्यात लॅटरल एन्ट्रीचा उल्लेख आहे. पण लागू केलं ते मोदी सरकारनं. 2016 साली मोदी सरकारनं त्यात अंशत: बदल केला आणि UPSC ची कुठलीही स्पर्धात्मक परिक्षा न देता थेट जॉईंट सेक्रेटरी पदावर नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. त्यालाच लॅटरल एन्ट्री म्हटलं जातं. हवं तर मराठीत मागच्या दारानं सुपरक्लासवन अधिकारी होणं म्हटलं तरी चालेल.

लॅटरल एन्ट्रीवर आक्षेप काय?

UPSC ही स्पर्धात्मक परिक्षा आहे आणि त्याची तयारी देशभरातून विद्यार्थी करत असतात. ही सर्वात कठिण परिक्षा समजली जाते. त्याची प्रतिष्ठाच वेगळी आहे. पण जर अशी स्पर्धात्मक परिक्षाच न देता थेट सुपरक्लासवन अधिकारी होता येत असेल तर मग UPSC चं महत्वं राहील कसं अशी शंका काहींना आहे. सोबतच मोदी सरकार RSS च्या लोकांना मागच्या दारानं प्रशासनात घुसवत असल्याचा आरोपही केला जातोय. तसच UPSC ची परिक्षा देऊन IAS, IPS झालेल्यांना हा प्रकार अपमानजनक वाटतो.

लॅटरल एन्ट्रीसाठी पात्रता काय?

लॅटरल एन्ट्रीसाठीही पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ज्या पदांसाठी तुम्ही अर्ज कराल, त्या फिल्डमध्ये तुम्हाला कमीत कमी 15 वर्षांचा अनुभव लागतो. तसच कॅबिनेट सेक्रेटरीच्या पॅनलसमोर तुमची मुलाखत होते. त्यातून तो उत्तीर्ण होईल त्याला थेट जॉईंट सेक्रेटरी पदावर नियुक्ती मिळते. ह्या उमेदवारांची नियुक्ती अर्थ, कृषी, सडक परिवहन, शिपिंग, पर्यावरण, ऊर्जा, कॉमर्स आणि हवाई वाहतूक विभागात केली जाते (Marathi report on UPSC lateral Entry).

आतापर्यंत कुणाची नियुक्ती झालीय का?

लॅटरल एन्ट्रीसाठी दुसऱ्यांदा नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यापुर्वी 10 संयुक्त सचिव पदासाठी आणि उपसचिव दर्जाच्या 40 पदांसाठी लॅटरल एन्ट्रीचं नोटीफिकेशन जारी करण्यात आलं होतं. त्यातून नियुक्तीचा निर्णयही झाला. 2018 साली संयुक्त सचिव पदासाठी सुचना काढली गेली. त्यात 6077 जणांनी अर्ज केला. त्यातून आयोगानं 9  वेगवेगळ्या मंत्रालयात ह्यातल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस केली.

Marathi report on UPSC lateral Entry

संबंधित बातम्या :

Nashik jilha parishad recruitment 2021| नाशिक जिल्हा परिषदेत नोकरीची नामी संधी, जाणून घ्या संपूण माहिती

CA May Exam 2021 Date Sheet: सीए फाऊंडेशनकडून परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या डिटेल वेळापत्रक

CBSE SSC EXAM : आईवडीलांच्या अपेक्षा पूर्ण कशा करायच्या? मोदी गुरुजींचा हा 1.57 सेकंदाचा व्हिडीओ सर्वांसाठी !

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI