AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CA May Exam 2021 Date Sheet: सीए फाऊंडेशनकडून परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या डिटेल वेळापत्रक

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडीया (ICAI) ने येत्या मे महिन्यात सीए (CA) फाऊंडेशन परीक्षेसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. (ca may 2021 exam date information marathi)

CA May Exam 2021 Date Sheet: सीए फाऊंडेशनकडून परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या डिटेल वेळापत्रक
सीए फॉऊंडेशन
| Updated on: Mar 06, 2021 | 4:38 PM
Share

मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडीया (ICAI) ने सीए (CA) फाऊंडेशन कोर्ससाठी मे मधील  परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा 24,,26, 28, आणि 30 जून रोजी घेण्यात येतील. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत, त्यांना ICAI च्या icai.org या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवता येईल.

आईसीएआई तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या सीए फाउंडेशन परीक्षेसाठी अर्जभरण्याची प्रक्रिया 20 एप्रिलपासून सुरु होणार आहे. 20 अप्रिल ते 4 मे 2021 या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरता येईल. इच्छुक उमेदवार ICAI च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकतात. परीक्षेसाठी लागणारी फि ही डेबिट किंवा क्रेडीट कार्डद्वारे भरण्याचा ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

परीक्षेचं वेळापत्रक काय?

आयसीएआयने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार पेपर 1 आणि पेपर 2 ची परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळचे 5 या काळात आयोजित केली जाईल. तसेच पेपर 3 आणि पेपर 4 हे दुपारी 2 ते 4 या वेळेत घेतले जातील. पेपर 3 आणि पेपर 4 साठी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी कोणताही आगावीचा वेळ दिला जाणार नाही. तर बाकीचे पेपर सोडवताना उमेदवारांना  15 मिनटं अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाईल. या 15 मिनिटांमध्ये उमेदवारांना प्रश्नपत्रिका वाचता येईल. यासंदर्भात अधिक माहिती आयसीएआयच्या वेबासाईटवर देण्यात आली आहे.

इंटरमीडिएट आणि फायनल दोन्ही अभ्यासक्रमांसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर 

ICAI ने इंटरमीडिएट आणि फायनल अभ्यासक्रमांसाठीसुद्धा परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. जाहीर तारखांनुसार इंटरमीडिएट आणि फायनल या अभ्यासक्रमांच्या  परीक्षा 21 मे पासून सुरु होणार असून 6 जून 2021 रोजी संपतील. दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. फायनलमधील  पेपर 6 हा दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या कालाधीत होईल.

इतर बातम्या :

Recruitment 2021 : ‘या’ मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची नामी संधी; अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस

IAF Pilot Recruitment: हवाई दलात पायलट बनायचे आहे, जाणून घ्या पदवीधर आणि 12 वी पास उमेदवारांना कसा मिळेल प्रवेश?

IBPS CRP RRB IX Officer Result 2021 : ऑफिसर स्केल 2,3 साठी प्रोव्हिजनल यादी जारी, सविस्तर पाहा

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.