Nashik jilha parishad recruitment 2021| नाशिक जिल्हा परिषदेत नोकरीची नामी संधी, जाणून घ्या संपूण माहिती

राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागात नाशिकमध्ये एकूण 256 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (Nashik jilha parishad recruitment)

Nashik jilha parishad recruitment 2021| नाशिक जिल्हा परिषदेत नोकरीची नामी संधी, जाणून घ्या संपूण माहिती
चाणक्य नीतीमध्ये आचार्य म्हणतात की ज्या देशात तुमचा आदर नाही, जिथे तुम्हाला रोजगार मिळत नाही, जिथे तुमचे मित्र नाहीत आणि जिथे तुम्हाला कोणतेही ज्ञान नाही अशा देशात राहू नका.
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 8:57 AM

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागातर्फे नाशिकमध्ये एकूण 256 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी तसेच वैद्यकीय शिक्षणात पदवी संपादन केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही एक नामी संधी आहे. (recruitment announced for 256 posts by National Health Mission Department in Nashik)

कोणत्या पदासांठी भरती होणार?

नाशिकच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान खात्यातर्फे एकूण 256 जागांसाठी राज्य सरकारकडून भरती करण्यात येत आहे. या सर्व जागा कंत्राटी किंवा मानधन तत्वावर भरण्यात येतील. आरोग्य खात्याने पात्र उमेदवाराना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. नाशिकमध्ये एकूण 20 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. आयुष एमओ, मेडिकल ऑफिसर, फार्माशिस्ट, स्टाफ नर्स, सायकॅट्रिक्स नर्स, प्रोग्राम कोऑर्डिनेटर , पब्लिक रिलेशन ऑफिसर, सिनियर ट्रिटमेन्ट सुपरवायझर, फिल्ड मॉनिटर, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर, प्रोग्राम असिस्टन्ट, रेडीओग्राफर आणि एक्स-रे टेक्नीशियन, सीटी स्कॅन टेक्नीशियन, ब्लड बँक टेक्नीशिनयन अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.स्टाफ नर्स या पदासाठी सर्वात जास्त म्हणजेच 183 जागांसाठी भरती होणार आहे.

अर्ज कसा करावा?

या सर्व  पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. 9 मार्च 2021  रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पत्त्यावर  विहीत नमुन्यातील अर्ज पाठवावा लागेल. पोस्ट किंवा कुरियरद्वारे नाशिकच्या आरोग्य विभागाला हा अर्ज पाठवता येईल. अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती  येथे  क्लिक केल्यावर पाहायला मिळेल. 9 मार्च ही अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख आहे.

पगार किती?

वरील सर्व 256 जागा या कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. तसेच, कराराचा कालावधी हा 11 महिने किंवा त्यापेक्षा कमी असू शकतो. प्रत्येक पदासाठी मिळणारा पगार हा मानधन स्वरुपात असेल. हे मानधन प्रत्येक पदासाठी वेगळे असेल. उमेदवाराची निवड झाल्यानंतर उमेदवाराला मानधनाव्यतीरिक्त कोणताही आगावीचा भत्ता मिळणार नाही. प्रत्येक पदासाठी किती मानधन असेल याची माहिती येथे क्लिक केल्यानंतर पाहता येईल .

इतर बातम्या :

NABARD Recruitment 2021: तज्ञ सल्लागार पदावर नोकरीची संधी, पगार 3.75 लाखांपर्यंत

Saraswat Bank Recruitment 2021: सारस्वत बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित करा अर्ज

9 लाख शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांचा झटका, वेगवेगळी कारणं देत नुकसान भरपाईचे अर्ज रद्द

(recruitment announced for 256 posts by National Health Mission Department in Nashik)
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.