Godrej Family Split : 127 वर्षे जुन्या गोदरेजची शकलं; अखेर झाल्या दोन कंपन्या

Godrej Family Split : गोदरेज कुटुंबातील वाटणीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. 127 वर्षांपूर्वी व्यवसायाची पायाभरणी करणाऱ्या गोदरेज समूहाचे दोन वाटे झाले आहेत. आदि गोदरेज आणि त्यांच्या भावात ठरलेल्या करारानुसार कंपन्यांची विभागणी झाली. .या वाटणीत कोणाच्या पदरात काय पडले ते पाहुयात..

Godrej Family Split : 127 वर्षे जुन्या गोदरेजची शकलं; अखेर झाल्या दोन कंपन्या
गोदरेज समुहाची विभागणी
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 9:50 AM

127 वर्ष जुन्या गोदरेज कुटुंबात आता वाटेहिस्से झाले आहेत. कंपन्यांची विभागणी झाली आहे. कुटुंबातील सदस्यांनी विभागणीवर स्वाक्षरी केली आहे. आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर यांना गोदरेज इंडस्ट्रीजचा अधिकार मिळाला आहे. त्यांतर्गत पाच कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. आदि गोदरेज यांचे चुलत भाऊ-बहिण जमशेद आणि स्मिता यांना सूचीबद्ध नसलेल्या कंपन्या मिळाल्या आहेत. त्यांना गोदरेज अँड बॉयसची मालिकी मिळाली. यासोबतच त्यांना मुंबईतील मोठा भूखंड आणि संपत्तीत मोठा वाटा देण्यात येणार आहे. गोदरेज समूहाने कुलूप तयार करण्यापासून सुरु केलेला व्यवसाय आता साबण, घरगुती उपकरणं आणि रिअल इस्टेटपर्यंत विखुरलेला आहे.

कोणत्या हिस्सेदारांमध्ये कशी झाली वाटणी

गोदरेज समूहाने या वाटणीविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, समूहाला, संस्थापक कुटुंबात दोन गटात विभाजीत करण्यात आले आहे. यामध्ये एक वाटा 82 वर्षीय आदि गोदरेज आणि त्यांचे भाऊ 73 वर्षीय नादिर यांना देण्यात आला आहे. तर दुसरीकडे त्यांचे चुलत भाऊ-बहिण, 75 वर्षीय जमशेद गोदरेज आणि 74 वर्षीय स्मिता गोदरेज कृष्णा यांच्यात वाटणी करुन देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

वाटणी झाली असली तरी ब्रँड एकच

वाटणीची प्रक्रिया झाल्यानंतर गोदरेज कुटुंबियांनी याविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, वाटणीची प्रक्रिया ही शेअरधारकांच्या मालकी हक्काचे पुनर्गठन असल्याचे गोदरेज कुटुंबाने स्पष्ट केले. दोन्ही गट गोदरेज ब्रँडचा उपयोग सुरु ठेवतील. वाटणी झाली असली तरी समान वारसा वाढविण्यासाठी आणि तो मजबूत करण्यासाठी दोन्ही गटांनी वचनबद्धता प्रतिपादित केली.

किती मोठा आहे समूह?

गोदरेज समूहाकडे सध्या 5 सूचीबद्ध कंपन्या आहेत. यामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्टस, गोदरेज ॲग्रोवॅट, गोदरेज प्रॉपर्टीज आणि लाईफ सायन्सेज यांचा समावेश आहे. सध्या या समूहाचे एकूण मूल्य 2.34 लाख कोटी रुपये आहे. कुटुंबातील पाच सदस्य, आदि गोदरेज, नादिर गोदरेज, जमशेद गोदरेज, स्मिता कृष्णा गोदरेज आणि रिशद गोदरेज यांच्याकडे G&B मध्ये प्रत्येकी 15.3% हिस्सेदारी आहे.

व्यवसायाची जबाबदारी अशी

सध्या गोदरेज कुटुंबात दोन गट आहेत. गोदरेज इंडस्ट्रीज अँड असोसिएट्स, त्याचे नेतृत्व आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ करतो. तर दुसरीकडे गोदरेज अँड बॉयसचे नेतृ्व जमशेद गोदरेज आणि त्यांची बहिण करते. आदि आणि नादिर गोदरेज हे गोदरेज अँड बायसमधील त्यांचा वाटा दुसऱ्या गटाला विक्री करतील. तर जमशेद गोदरेज आणि त्यांचे कुटुंब गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्समधील वाटा भावाच्या नावावर करतील.

Non Stop LIVE Update
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल.
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप.
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्...
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्....