Gold and Silver Rate Today : दसऱ्याला सोनं कसं लुटणार? सोने-चांदीच्या दरवाढीचा बॉम्ब! किंमत किती?
Gold and Silver Rate Today : मध्यंतरीचे दोन दिवस सोडले तर सोने आणि चांदीची दरवाढ सुरूच आहे. सातत्याने किंमती वाढत असल्याने दसऱ्याला सोनं कसं लुटणार? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. काय आहेत आता किंमती?

Gold and Silver Rate Today : मागील दोन दिवस सोडले तर मौल्यवान धातुच्या किंमती सातत्याने वाढत आहे. यंदा तर सोन्याने मोठी मजल मारली. सोन्याने लाखाचा टप्पा ओलांडला असून त्याची सव्वा लाखाकडे धाव सुरु आहे. तर दुसरीकडं चांदीने सोन्यापेक्षा मोठी झेप घेतली आहे. जागतिक बाजारातही दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. या आठवड्यात अमेरिकेन रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्याने दोन दिवस मौल्यवान धातुत घसरण दिसली. तर आता पुढील आठवड्यात अमेरिकेचा आर्थिक ताळेबंद समोर येईल. त्यात नोकरी, अर्थव्यवस्थेची स्थिती, सकल राष्ट्रीय उत्पन्न यांची आकडेवारी समोर येईल. हे आकडे सकारात्मक राहण्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही धातुत मोठी रॅली येण्याची शक्यता आहे. तर सातत्याने किंमती वाढत असल्याने दसऱ्याला सोनं कसं लुटणार? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. काय आहेत आता किंमती?
सोन्याची किंमत किती?
goodreturns.in नुसार, 18 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने 54 रुपयांनी घसरले होते आता सोन्याचा भाव 11,117 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10,190 रुपये होता. तर 18 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा भाव 8,338 रुपये इतके होता. तर 19 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने 16 रुपयांनी वधारले होते. 24 कॅरेट सोने 11,148 रुपये तर 22 कॅरेट सोने 10,220 रुपये इतके होते. आजही दोन्ही धातुत दरवाढ दिसून येत आहे. 24 कॅरेट सोने 11,230 रुपये तर 22 कॅरेट सोने 10,295 रुपये असा भाव आहे.
चांदीत 4000 रुपयांची वाढ
17 सप्टेंबर रोजी 2000 रुपयांची घसरण झाली होती. तर 18 सप्टेंबर रोजी चांदी 2000 रुपयांनी उतरली होती. 19 सप्टेंबर रोजी चांदीत 2000 रुपयांची वाढ झाली. तर आज सकाळी 2 हजारांनी चांदी वधारली . गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,35,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव घसरला आहे. 24 कॅरेट सोने 1,09,780 रुपये, 23 कॅरेट 1,09,340, 22 कॅरेट सोने 1,00,500 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 82,330 रुपये, 14 कॅरेट सोने 64,220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,28,000 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
