Gold price: गुढीपाडव्याला सोनं महागण्यापूर्वी खरेदी करायचेय, जाणून घ्या सोने -चांदीचा आजचा दर किती?

महाराष्ट्रातील सोन्याची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या जळगावात बुधवारी सोन्याचा प्रतितोळा दर किती? Gold and silver rates

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:42 AM, 9 Apr 2021
Gold price: गुढीपाडव्याला सोनं महागण्यापूर्वी खरेदी करायचेय, जाणून घ्या सोने -चांदीचा आजचा दर किती?
सोने आणि चांदीचा दर

मुंबई: साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे साहजिकच यादिवशी सोने महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वीच सोने खरेदी (Gold price) करण्याचा अनेकांचा कल आहे.  महाराष्ट्रातील सोन्याची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या जळगावात बुधवारी सोन्याचा प्रतितोळा दर 46,610 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो 64,813 रुपये इतका आहे. (Gold and silver price today in Mumbai)

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोने आणि चांदीचा दर काय?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शुक्रवारी सोन्याचा प्रतितोळा दर 45,560 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. कालपेक्षा हा दर किंचित वाढला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस मुंबईतील सोन्याचा दर साधारण 43 हजारांच्या घरात होता. राज्यात लॉकडाऊनचे ढग दाटू लागल्यानंतर या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता हा दर 45,560 च्या आसपास पोहोचला असून गुढीपाडव्याच्या दिवशी सोने आणखी महागण्याची शक्यता आहे.

तर पुण्यातील सोन्याचा प्रतितोळा दर 45,560 इतकाच आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्येही जळगाव बाजारपेठेच्या तुलनेत सोने किचिंत स्वस्त आहे. या दोन्ही शहरांमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर 45,560 इतका आहे.

सोनं आणखी स्वस्त होणार?

आता लग्नाचा सिझन सुरु झालेला आहे आणि त्यामुळे सोन्याला मागणीही बऱ्यापैकी आहे. सोन्यातल्या गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. गेल्या ऑगस्टमध्ये सोनं प्रतितोळा 56 हजार 254 वर पोहोचलेलं होतं. तो उच्चांकी भाव होता. त्यानंतर आता तो 45 हजाराकडे आलेला आहे. याचाच अर्थ सोनं जवळपास 12 हजारांनी स्वस्त झालेलं आहे. पुढच्या काही काळात सोनं आणखी स्वस्त होऊन ते 42 हजारापर्यंत येऊ शकतं असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. चांदीही याच सर्व काळात जवळपास 10 हजारानं स्वस्त झाली आहे.

मोदी सरकारच्या निर्णयामुळे सोन्याचे दर खाली?

गेल्यावर्षी म्हणजे 7 मे रोजी पहिल्यांदाच सोन्यानं 45 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सोन्याचे दर चढेच राहिले. अर्थसंकल्पात इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची घोषणा केली गेली आणि त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरु झाली. गेल्या दहा दिवसात दोन दिवसांचा अपवाद वगळता सोन्याचे भाव पडताना दिसत आहेत. मे महिन्यानंतर पहिल्यांदाच दर 46 हजारांच्या खाली आले आहेत.

संबंधित बातम्या :

सोनं-चांदी झाली स्वस्त; वाचा पुढे सोनं वधारेल की आणखी घसरेल

(Gold and silver price today in Mumbai)