AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Outlook | मार्च महिन्यात सोनं 50 हजारांचा टप्पा गाठणार? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…

सोन्याची चमक सध्या किंचितशी कमी झाली आहे. पण, मार्च महिना सोन्यासाठी कसा असेल?, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

Gold Price Outlook | मार्च महिन्यात सोनं 50 हजारांचा टप्पा गाठणार? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात...
Gold Price
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 5:20 PM
Share

मुंबई : सोन्याची चमक सध्या किंचितशी कमी झाली आहे. पण, मार्च महिना सोन्यासाठी कसा असेल?, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. पुढच्या महिन्यात सोन्याची चमक परत येईल का? यावर एका प्रसिद्ध बिझिनेस वाहिनीने एक सर्वेक्षण केले. वेगवेगळ्या दलालांनी यावर आपले मत दिले आहे. जवळपास सर्व तज्ज्ञांनी असे सांगितले की, येणाऱ्या काळात सोने निश्चितच मोठा टप्पा गाठेल (Gold Price Outlook Gold  price will reach Rs 50,000 in March).

शुक्रवारीही सोन्याचे भाव घसरले!

शुक्रवारी सराफा बाजारातही काहीशी तेजी दिसून आली. सोन्याच्या किंमतीत 200 रुपयांनी घट झालेली दिसली. एमसीएक्समध्ये सोन्याचे दर 46,000 रुपयांच्या खाली घसरले. तर, एमसीएक्सवर चांदी 1200 रुपयांनी घसरून 68,000च्या जवळ आली आहे. शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केट दोन्ही एकाचवेळी कोसळत आहेत, हे फार क्वचितच घडते आहे, परंतु शुक्रवारी बाजारात हेच दृश्य दिसून आले.

मार्चमध्ये सोन्याची किंमत काय असेल?

ब्रोकरलक्ष्य (₹ / 10 ग्राम)

– मोतीलाल ओसवाल : ₹ 50,000/-

– पॅराडाईम कमोडिटी : ₹ 49,000/-

– अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज : ₹ 49,000/-

– आनंद राठी : ₹ 49,000/-

– एसएमसी कॉमट्रेड : ₹ 49,000/-

– एंजल कमोडिटी : ₹ 48,000/-

– चॉइस ब्रोकिंग : ₹ 48,000/-

– कोटक सिक्युरिटीज : ₹ 47,000/-

– ट्रस्टलाईन : ₹ 47,000/-

– पृथ्वी फिनमार्ट : ₹ 47,000/-

(Gold Price Outlook Gold  price will reach Rs 50,000 in March)

सोने 50000चा टप्पा गाठेल!

सोन्याच्या दराबद्दल तज्ज्ञांशी विशेष संवाद साधला असता, जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल म्हणाले की, पुढच्या महिन्यात सोन्याची किंमत 50000 रुपयांपर्यंत पोहोचेल. ते म्हणाले की, अमेरिकेच्या रिफॉर्म धोरणामुळे यावर थोडासा दबाव आहे. पण, येणाऱ्या काळात सोने पुन्हा सावरेल, अशी अपेक्षा आहे. लोकांना सोनं खरेदी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आणि ते म्हणाले की, आता सोने खरेदी केल्यास फायदा होईल.

पुन्हा येईल सोन्याला झळाळी!

मोतीलाल ओसवालच्या नवनीत दमानी म्हणाल्या की, सोने पुन्हा एकदा चमकेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुपया देखील मजबूत होत आहे, त्यामुळे सोन्याची चमक लवकरच वाढेल, अशी अपेक्षा आहे. ते म्हणाले की, जरी सोने शॉर्ट टर्ममध्ये घसरळे असले, तरी लाँग टर्ममध्ये त्याची किंमत 50000 ते 51000 हजारांवर जाईल.

दागिन्यांची खरेदी वाढेल!

आनंद राठीचे जिगर त्रिवेदी म्हणाले की, सोन्यावर सध्या दबाव पाहायला मिळत आहे. त्यांनी स्टॉप लॉस 46250 ठेवा आणि 45800चे टार्गेट ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, दागिने खरेदी केवळ भारतातच नव्हे, तर चीनमध्येही वाढेल. मार्चच्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ होईल, असे जवळजवळ सर्व तज्ज्ञांनी सांगितले.

(टीप : गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Gold Price Outlook Gold  price will reach Rs 50,000 in March)

हेही वाचा :

SBI चे 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलवर SMS आल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…

सोन्यात गुंतवणुकीचे बरेच पर्याय; परंतु नफ्यावर द्यावा लागणार कर, नेमकी योजना काय?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.