AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Price : सोने-चांदीत तुफान, रविवारी 10 ग्रॅमसाठी इतके पैसे मोजा, किंमत वाचून ग्राहकांना लागली धाप

Gold And Silver Price Today : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदीचे दर विक्रमी उच्चांकी वर पोहोचले आहेत. वायदे बाजारात(MCX) पण सोन्याच्या किंमतीत बदल दिसून आला. काय आहेत आता किंमती?

Gold-Silver Price : सोने-चांदीत तुफान, रविवारी 10 ग्रॅमसाठी इतके पैसे मोजा, किंमत वाचून ग्राहकांना लागली धाप
सोने-चांदीचा भाव कायImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 13, 2025 | 12:17 PM
Share

सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउताराचे सत्र आहे. रविवारी सोने खरेदीची योजना असेल अथवा गुंतवणुकीची तयारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 2025 मध्ये सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 1 लाखांच्या पुढे झेप घेतली आहे. तर काही दिवसांपूर्वी सोन्यात मोठी घसरण पण ग्राहकांनी अनुभवली. गेल्या आठवड्याचा विचार करता वायदे बाजारासह (MCX) स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. आठवडाभरात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 800 रुपयांची तेजी दिसून आली. दुसरीकडे जळगावच्या सरापा बाजारातही दोन्ही धातुच्या किंमतीत वाढ दिसून आली.

वायदे बाजारात किती वाढल्या किंमती?

वायदे बाजारात ( MCX Gold Rate) सोन्याच्या किंमतीत बदल दिसून आला. 5 ऑगस्ट रोजीच्या 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 96,990 रुपये प्रति ग्रॅम इतकी आहे. तर गेल्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी 11 जुलै रोजी त्याची किंमत 97,830 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचली आहेत. म्हणजे या दोन वायद्यात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 840 रुपयांना वाढल्याचे दिसून आले आहे.

जळगाव सराफा बाजारात किती किंमत?

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांत सोने 1 हजाराने, तर चांदी 5 हजारांनी महागली आहे.सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 1 हजार 249 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 16 हजार 390 रुपयांवर पोहोचले आहे. सराफा बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने 1 लाख 16 हजारांचा आकडा पार केला. या दरवाढीचे नेमके कारण स्पष्ट होत नसले तरी वायदा बाजारातील (कमोडिटी मार्केट) नफेखोरी असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.