AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने आणि चांदीने दिली आनंदवार्ता, भावात झाली इतकी घसरण

Gold Silver Rate Today 21 February 2024 | फेब्रुवारी महिन्यात सोने आणि चांदीने नवीन उच्चांक गाठला नाही. दोन्ही मौल्यवान धातूचे भाव घसरले आहेत. गेल्या आठवड्याच्या शेवटी आणि या आठवड्याच्य सुरुवातीला दोन्ही धातूत दरवाढ झाली तर आता किंमतीत घसरण आली आहे. दोन महिन्यांपासून असाच ट्रेंड सुरु आहे.

Gold Silver Rate Today | सोने आणि चांदीने दिली आनंदवार्ता, भावात झाली इतकी घसरण
| Updated on: Feb 21, 2024 | 8:29 AM
Share

नवी दिल्ली | 21 February 2024 : डिसेंबर 2023 मध्ये सोने आणि चांदीने नवीन उच्चांक गाठला होता. किंमती सर्वकालीन उच्चांकावर पोहचल्या होत्या. त्यानंतर सोने-चांदी मोठा पल्ला गाठणार असे वाटत होते. पण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मौल्यवान धातूंना हा पल्ला पण गाठता आलेला नाही. गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी 1500 रुपयांनी महागली. आठवड्याच्या शेवटी सोने 300 रुपयांनी तर चांदीत 2,000 रुपयांनी वधारली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पण मौल्यवान धातूत वाढ झाली. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 21 February 2024)

सोन्याने दिला दिलासा

गेल्या आठवड्याच्या शेवटी 16 फेब्रुवारी रोजी 200 तर 17 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी महागले. तर 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. 20 फेब्रुवारी रोजी भाव 100 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 1000 रुपयांनी स्वस्त

चांदीत गेल्या काही दिवसांपासून चढउताराचे सत्र सुरु आहे. 16 फेब्रुवारी रोजी 1100 रुपयांनी किंमती वधारल्या. 17 फेब्रुवारी रोजी 900 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. तर सोमवारी, 20 फेब्रुवारी रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 20 फेब्रुवारी रोजी किंमती 500 रुपयांनी घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले आणि चांदी उतरली. 24 कॅरेट सोने 62,139 रुपये, 23 कॅरेट 61,890 रुपये, 22 कॅरेट सोने 56,919 रुपये झाले. 18 कॅरेट 46,604 रुपये, 14 कॅरेट सोने 36,351 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,898 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा