Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 25 October 2024 : मोठी आनंदवार्ता, सोन्याचा भाव कोसळला; चांदीला झटका, किंमती तरी काय?

Gold Silver Rate Today 25 October 2024 : दरवाढीच्या पैजा जिंकणाऱ्या सोन्याने अचानक यूटर्न घेतला. सोन्याचा भाव कोसळला. सोन्यात तुफान पडझड झाली. या घसरणीने खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. तर दिवाळीच्या मुहूर्तावर चांदीने दरवाढीचे रॉकेट पेटवले. पण चांदीतही घसरण झाली. काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 25 October 2024 : मोठी आनंदवार्ता, सोन्याचा भाव कोसळला; चांदीला झटका, किंमती तरी काय?
सोने-चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 8:37 AM

गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा वारू जोरदार उधळला आहे. सोन्या पाठोपाठ चांदीने पण मोठी भरारी घेतली. पण अचानक सोन्याचा भाव कोसळला. सोन्याच्या दरात मोठी पडझड झाली. या घसरणीने खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला. दिवाळीचा मुहूर्त साधत चांदी तळपली. चांदी नवनवीन विक्रमाला गवसणी घालत आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत चांदी सुस्तावली होती. चांदीने ही मरगळ झटकली. चांदीने मोठा पल्ला गाठला आहे. पण अचानक या दरवाढीला ब्रेक लागला. चांदीत ही घसरण दिसली. आता काय आहेत या मौल्यवान धातुचे भाव? (Gold Silver Price Today 25 October 2024 )

सोन्यात 600 रूपयांची पडझड

मागील आठवड्यात सोने 1600 रुपयांनी महागले होते. तर या आठवड्यात सोन्याने 650 रुपयांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर सोन्याचा भाव कोसळला. 21 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी वाढले. 23 ऑक्टोबरला 430 रुपयांची उसळी आली. तर 24 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 600 रूपयांनी घसरला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत मोठी घसरण

मागील आठवड्यात चांदी 3,000 रुपयांनी वधारली होती. या आठवड्यात चांदीने 4,500 रुपयांची उसळी घेतली. त्यानंतर आता किंमतीत घसरण आली आहे. 21 ऑक्टोबरला 1500 रुपये, 22 ऑक्टोबर रोजी 1,000, 23 ऑक्टोबर रोजी 2,000 रुपयांनी चांदी महागली. तर 24 ऑक्टोबर रोजी चांदी 2,000 रुपयांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,02,000 रुपये झाला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,246, 23 कॅरेट 77,933, 22 कॅरेट सोने 71,673 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,685 रुपये, 14 कॅरेट सोने 45,774 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,493 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....