शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी देतेय त्वरित कर्ज

एसबीआय तत्काळ ट्रॅक्टर कर्ज हे कृषी मुदत कर्ज आहे. ट्रॅक्टर अॅक्सेसरीजची किंमत बँकेने दिलेल्या कर्जामध्ये समाविष्ट केली जाणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर कर्जामध्ये घेतलेली रक्कम शेतकरी 4 ते 5 वर्षांत लगेचच बँकेत भरू शकतात. बँकेने वित्तपुरवठा केलेल्या ट्रॅक्टरचा व्यापक विमा आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी देतेय त्वरित कर्ज
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 7:43 AM

नवी दिल्ली : शेती करण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर घेऊन तुम्ही कंटाळला असाल आणि नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. देशातील सर्वात मोठे कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी ‘तत्काळ ट्रॅक्टर लोन’ (एसबीआय तत्काळ ट्रॅक्टर लोन) कर्जाची एक विशेष योजना आणलीय. या अंतर्गत SBI ट्रॅक्टर विमा आणि नोंदणी शुल्कासह ट्रॅक्टरच्या किमतीच्या 100% पर्यंत कर्ज प्रदान करते.

ट्रॅक्टर अॅक्सेसरीजची किंमत बँकेच्या कर्जामध्ये समाविष्ट नाही

एसबीआय तत्काळ ट्रॅक्टर कर्ज हे कृषी मुदत कर्ज आहे. ट्रॅक्टर अॅक्सेसरीजची किंमत बँकेने दिलेल्या कर्जामध्ये समाविष्ट केली जाणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर कर्जामध्ये घेतलेली रक्कम शेतकरी 4 ते 5 वर्षांत लगेचच बँकेत भरू शकतात. बँकेने वित्तपुरवठा केलेल्या ट्रॅक्टरचा व्यापक विमा आहे. 25/40/50 टक्के (चालान + विमा + नोंदणी) ट्रॅक्टरच्या किमतीची रक्कम शून्य दराच्या टीडीआरमध्ये जमा करावी. बँकेने वित्तपुरवठा केलेले ट्रॅक्टर कर्जाची परतफेड होईपर्यंत बँकेकडे असेल, म्हणजेच ते एक प्रकारे गहाण ठेवले जाईल. तसेच मार्जिन मनी म्हणून स्वीकारलेल्या टीडीआरवर बँकेचा अधिकार असेल.

एसबीआय कर्ज कोणाला मिळणार?

तत्काळ ट्रॅक्टर कर्जासाठी तुमच्याकडे किमान 2 एकर जमीन असावी. सर्व शेतकरी या योजनेंतर्गत बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकतात. एसबीआयने कर्जामध्ये नमूद केलेले नातेवाईकच सह-अर्जदार बनू शकतात.

अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

कर्जासाठी अर्ज भरा, यामध्ये कोणत्याही डीलरकडून ट्रॅक्टरचे कोटेशनदेखील टाका. ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, पॅन, पासपोर्ट, आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्सपैकी एक असावे. पत्त्याच्या पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्समधील एक असावे. याशिवाय लागवडीयोग्य जमिनीचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच 6 पोस्ट डेटेड चेक द्यावे लागतील.

एसबीआयला किती व्याज द्यावे लागेल?

कर्जाच्या रकमेतून टीडीआरची रक्कम वजा केल्यानंतर उर्वरित रकमेवर व्याज आकारले जाईल. – मार्जिन 25%: एक वर्षाचा MCLR + 3.25% p.a. अर्थात 10.25 टक्के. – मार्जिन 40%: एक वर्षाचा MCLR + 3.10% p.a. अर्थात 10.10 टक्के. – मार्जिन 50%: एक वर्ष MCLR + 3.00% p.a. म्हणजे 10 टक्के. प्रारंभिक शुल्क म्हणून कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के प्रक्रिया शुल्क आहे.

संबंधित बातम्या

सोने आणि चांदीची किंमत आणखी स्वस्त, पटापट तपासा ताजे दर

पोस्ट ऑफिस योजनेत आता किती व्याजदर?, जाणून घ्या

Good news for farmers! SBI provides instant loan for purchase of tractors

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.