चांगली बातमी! सोन्याचे भाव 4 महिन्यांच्या नीचांकावर, जाणून घ्या नवे दर

भारतीय बाजारात सोन्याची किंमत सुमारे 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आलीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 46,000 रुपयांनी घसरल्यानंतर 4 महिन्यांच्या नीचांकावर आला.

चांगली बातमी! सोन्याचे भाव 4 महिन्यांच्या नीचांकावर, जाणून घ्या नवे दर
Gold Silver Price
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 11:29 AM

नवी दिल्लीः Gold/Silver Price Today: जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. भारतीय बाजारात सोन्याची किंमत सुमारे 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आलीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 46,000 रुपयांनी घसरल्यानंतर 4 महिन्यांच्या नीचांकावर आला. बुधवारी एमसीएक्सवरील ऑक्टोबर वायदा सोने 0.15 टक्के प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह व्यापार करीत आहे. मात्र, सप्टेंबर फ्युचर्समध्ये चांदी 0.14 टक्क्यांनी घसरली.

सोन्याची नवीन किंमत

MCX वर ऑक्टोबर वायदा सोन्याचा भाव 0.15 टक्के किंवा 68 रुपयांच्या वाढीसह 46,030 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करीत आहे. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये MCX वरील सोन्याच्या वायदा किमतीत 1.3 टक्के घट झाली.

चांदीची नवीन किंमत

त्याच वेळी सप्टेंबर फ्युचर्स चांदीची किंमत 0.14 टक्के किंवा 86 रुपयांनी घटून 62,550 रुपये प्रति किलो झाली. गेल्या तीन सत्रात चांदीच्या किमतीत 1.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, पिवळ्या धातूतील ही घसरण मजबूत अमेरिकन डॉलर आणि अमेरिकेतील नोकरीच्या आकडेवारीमुळे आली. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीला 1,680 प्रति डॉलर औंस मजबूत समर्थन आहे.

सराफा बाजारातील किंमत काय?

मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 176 रुपयांनी कमी होऊन 45,110 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाले. सोमवारी सोने 45,286 च्या पातळीवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या चार ट्रेडिंग सत्रांपासून त्याच्या किमतीवर दबाव आहे. त्याच वेळी दिल्ली सराफा बाजारात चांदी 898 रुपयांनी घसरून 61,765 रुपये प्रति किलोवर बंद झाली. यापूर्वी मागील ट्रेडिंग सत्रात तो 62,663 रुपयांवर बंद झाला होता.

13 ऑगस्टपर्यंत सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये (Sovereign Gold Bond) गुंतवणूक करण्याची संधी

सॉवरेन गोल्ड बाँड योजना 2021-22 मालिका 5-9 ऑगस्ट ते 13 ऑगस्टदरम्यान उघडण्यात आली. सेटलमेंटची तारीख 17 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज कालावधीत बॉण्डची इश्यू किंमत 4,790 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली. गोल्ड बॉण्डची किंमत बाजारातील सोन्याच्या स्पॉट प्राईसशी जोडलेली असते. यामध्ये गुंतवणुकीवरील व्याजाच्या स्वरूपात अतिरिक्त परतावा उपलब्ध आहे. देशातील नागरिक हिंदू अविभक्त कुटुंब ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था यामध्ये गुंतवणूक करू शकतात. सॉवरेन गोल्ड बाँड योजना अशा गुंतवणूकदारांसाठी चांगली आहे, ज्यांना भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक करायची नाही.

2 दिवसात चांदीचे दर तब्बल 4 हजार रुपयांनी घसरले

सुवर्णनगरी जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या चांदीचे दर घसरले आहेत. गेल्या 2 दिवसात चांदीचे दर तब्बल 4 हजार रुपयांनी तर सोन्याचे दर 1 हजार 300 रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक दुकानांमध्ये गर्दी करत असल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितलं. सोने व चांदी या दोन्ही धातूंचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात गेल्या 3 दिवसात चांदीचे दर तब्बल 4 हजार रुपयांनी तर सोन्याचे दर 1 हजार 200 रुपयांनी खाली आले आहेत. आज, बुधवारी जळगावात सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह 47 हजार 700 रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर जीएसटी शिवाय 63 हजार रुपये प्रति किलो आहेत.

संबंधित बातम्या

Videocon Industries प्रकरणात सेबीने 11 कंपन्यांना ठोठावला दंड

सुवर्णनगरी जळगावात सोन्या-चांदीचे दर घसरले, ग्राहकांची दुकांनामध्ये खरेदीसाठी गर्दी, तोळ्याचा भाव काय?

Good news! Gold prices hit a 4-month low, find out new rates

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.