सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात किती वाढ?

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. आता एकत्रित 11 टक्के वाढीसह तो दिला जाणार असल्यानं नव्या वाढीनंतर तो 28 टक्के होणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात किती वाढ?

नवी दिल्ली: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government employees) एक आनंदाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी 2021 पासून 4 टक्के वाढ निश्चित आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा एकूण महागाई भत्ता 28 टक्के होणार आहे. (Government employees will get 4% increase in dearness allowance)

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापू्र्वी जुलै 2020 मध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली होती. तर जानेवारी 2020 मध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली होती. आता जानेवारी 2021 मध्ये देय असलेली 4 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण वाढ 11 टक्के होणार आहे. दरम्यान, सरकारने सध्या महागाई भत्त्यातील वाढ गोठवलेली आहे. त्यामुळे वाढीव महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही.

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. आता एकत्रित 11 टक्के वाढीसह तो दिला जाणार असल्यानं नव्या वाढीनंतर तो 28 टक्के होणार आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ

सरकारने महागाई भत्त्यात केलेल्या वाढीचा फायदा केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर 60 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे. विविध राज्यांच्या कर्मचाऱ्यांनाही सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

कोरोना संकटात महागाई भत्त्यावरून यंदा केंद्रीय कर्मचारी  (Central employees) आणि निवृत्तीवेतनधारकांच्या (pensioners) पदरी निराशा पडली होती. कारण सरकार महागाई भत्ता हा जुन्या दरानेच देणार आहे. नवीन दराने लाभ होण्याची अपेक्षा होती. पण कोरोनाच्या संकटामुळे सरकारने आहे त्याच दरात महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. परंतु कोरोना संकटामुळे केंद्र सरकारच्या सरकारी तिजोरीवर मोठा परिणाम झाला आहे. महागाई भत्त्यावर  जून 2021 नंतरच कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना सरकार सवलत देऊ शकेल, अशी शक्यताही नोव्हेंबरमध्ये वर्तवण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

Viral Satya: केंद्र सरकार दर महिन्याला मुलींच्या बँक खात्यात 2500 रुपये टाकते?; जाणून घ्या…

दिवसाला केवळ 63 रुपये भरा आणि 7 लाख मिळवा, LIC ची खास योजना नेमकी काय?

Government employees will get 4% increase in dearness allowance

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI