Education : महागाईने मुलांच्या शिक्षणाची लागली चिंता, हा उपाय हमखास तारणार..

Education : वाढता शैक्षणिक खर्च तुम्हाला योग्य नियोजन केल्यास पूर्ण करता येईल.

Education : महागाईने मुलांच्या शिक्षणाची लागली चिंता, हा उपाय हमखास तारणार..
आर्थिक नियोजन फायद्याचेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 6:47 PM

नवी दिल्ली : भारतात शैक्षणिक खर्च (Educational Expenditure) दिवसागणिक वाढत आहे. खासगी शाळा, महाविद्यालये आणि उच्च शिक्षणाचा खर्च आताच डोळे पांढरा करणारा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातीलच नाही तर शहरी भागातील आई-वडिलांच्या जीवाला घोर लागला आहे. शैक्षणिक महागाई (Education Inflation) सध्या वाढत आहे. त्यावर उपाय योजना करणे हे फायद्याचे ठरते. मुलांची शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांनी पूर्वीपासूनच योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

केवळ शिकवणी खर्च वाढल्याने Education Cost मध्ये सातत्याने वाढ होत नाही. तर राहणीमान उंचावल्याने त्यावरचा खर्च, शिकवणीचा खर्च, व्यवस्थापकीय खर्च, प्रवास खर्च, नवीन मॉर्डन शाळांचे वाढलेले शैक्षणिक शुल्क, खाण्या-पिण्याचा खर्च या सर्वच गोष्टींचा खर्च वाढला आहे.

अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात. तिथला खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. परदेशातील मोठ्या, नामांकित महाविद्यालये, विद्यापीठात शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली तर तुमचे नशीब नाही तर तिथला खर्च सर्वसामान्य आई-वडिलांच्या हाताबाहेरचा आहे.

हे सुद्धा वाचा

परंतु पालकांनी मुलं लहान असतानाच योग्य नियोजन केल्यास त्यांना मुलांच्या वाढत्या शैक्षणिक खर्चासाठी निधी जमावता येतो. त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. योग्य ठिकाणी केलेली दीर्घ आर्थिक गुंतवणूक फायद्याची ठरते.

कम्पाऊंडिंगच्या करिष्म्याने तुम्हाला तुमचे आर्थिक लक्ष गाठते येते. पारंपारिक बचत योजनांपेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तुम्हाला अधिकचा परतावा देते. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा निधी उभारता येतो.

ट्रेड स्मार्टचे CEO विकास सिंघानिया यांनी याविषयीचा सल्ला दिला आहे. त्यानुसार, इक्विटीमध्ये नियमीत मासिक बचतीचे लक्ष ठेवल्यास त्याचा फायदा होतो. जर मुलांच्या जन्मावेळी 10,000 रुपये प्रति महिना SIP सुरु केल्यास त्याचा भविष्यात फायदा होतो.

मुलांच्या जन्मावेळी 10,000 रुपये प्रति महिना SIP सुरु केल्यास, मुलं 15 वर्षांची झाल्यावर वार्षिक 12% परतावा मिळेल. तोपर्यंत 45.28 लाख रुपये जमा होतील. अजून पाच वर्षे पुढे एसआयपी सुरु ठेवल्यास आणखी मोठा निधी उभारता येईल.

तुम्ही दोन हजार रुपयांपासूनही एसआयपी सुरु करु शकता. त्यामानाने रक्कम कमी जमा होईल. पण ही रक्कम मदत करेल. तुम्ही मुलांसाठी शैक्षणिक कर्जही घेऊ शकता. त्यातूनही मुलांची स्वप्न पूर्ण करता येतात.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.