पीएफ खात्यात किती बाकी आहे रक्कम, माहिती करण्यासाठी उपयोगात आणा ही पद्धत

PF Account : पीएफमध्ये अनेक दिवसांपासून तु्म्ही बॅलन्स चेक केले नाही का? त्यात आता किती रक्कम जमा आहे, हे तुम्हाला सहज कळू शकते. केंद्र सरकारने यावेळी समाधानकारक व्याजदर ठेवल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुमच्या खात्यातील शिल्लक या सोप्या पद्धतीने तपासाता येईल.

पीएफ खात्यात किती बाकी आहे रक्कम, माहिती करण्यासाठी उपयोगात आणा ही पद्धत
असे झटपट तपासा तुमचे बॅलेन्स
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 5:26 PM

तुम्ही अनेक दिवसांपासून पीएफ खात्यात बँलेन्स चेक केले नाही का? तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे माहिती करुन घ्यायचे असेल तर त्यासाठी पीएफ कार्यालयात जाण्याची गरज नाही. आर्थिक वर्ष 2023-24 साठी पीएफ खात्यावर 8.25 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले आहे. ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या पगार पत्रकावरील माहिती आधारे, त्यांच्या पीएफ खात्यात किती रक्कम जमा होते, हे समजते. पीएफ खात्यातील बॅलेन्स, शिल्लक रक्कम तपासण्यासाठी सदस्यांना या सोप्या पद्धतीचा वापर करता येईल.

या चार पद्धतीने तपासा बॅलन्स

अनेक सदस्यांना पासबुकमध्ये किती रक्कम शिल्लक आहे. किती रक्कम काढता येते. खात्यासंबंधीची अपडेट कशी तपासावी याची माहिती नसते. त्यांना या चार पद्धतीने खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती घेता येईल.

हे सुद्धा वाचा

उमंग ॲपद्वारे तपासा बॅलन्स

  • स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करा. त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा. येथे EPFO ​​पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा.

मिस्ड कॉलद्वारे PF मधील शिल्लक जाणून घ्या

तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 अथवा 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

एसएमएसद्वारे जाणून घ्या रक्कम

पीएफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन माहिती करुन घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.

EPFO पोर्टलवरुन तपासा बॅलेन्स

EPFO संकेतस्थळावर employees सेक्शन निवडा. त्यानंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा. तुमचा UAN आणि पासवर्ड नोंदवा. त्यानंतर तुम्हाला पीएफ पासबुक एक्सेस करता येईल. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्ससह कर्मचारी आणि कंपनीचे योगदान यामध्ये दिसून येते. पीएफ हस्तांतरणाची एकूण रक्कम आणि पीएफवरील व्याजाची रक्कम दिसेल.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.