AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरजेनुसार गुंतवणूक कशी करायला हवी, पैसे बाजूला ठेवताना ‘या’ चुका कधीच करु नका

आजच्या महागाईच्या काळात महिन्याला काही पैसे बाजूला ठेवणं फार कठीण आहे. कारण खर्च कसा आणि कुठे होते... याबद्दल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे पैसे बाजूला ठेवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे... हे जाणून घ्या...

गरजेनुसार गुंतवणूक कशी करायला हवी, पैसे बाजूला ठेवताना 'या' चुका कधीच करु नका
| Updated on: Apr 14, 2026 | 2:51 PM
Share

आपण अनेकदा म्हणतो की बचत झालीच पाहिजे. पण आजच्या महागाईच्या काळात ते फार कठीण आहे. पैसे कुठे आणि कसे खर्च होतात. याबद्दल फार कोणाला अंदाज नसतो. याच कारणामुळे गरजेच्या वेळी पैसे जवळ राहत नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महिन्याला थोटी तरी बचत झालीच पाहिजे… प्रत्येकाच्या आर्थिक गरजा आणि परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार गुंतवणूक केल्यास सर्वोत्तम परतावा आणि लाभ मिळतो. सुरक्षित आणि स्थिर अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी बचत किंवा गुंतवणूक करणे आवश्यक आहे. याच कारणास्तव, अनेक लोक आपल्या मासिक उत्पन्नातून ठराविक रक्कम गुंतवतात. बहुतेक लोक जी सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे योग्य गुंतवणुकीची निवड न करणे.

गुंतवणूक करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच ती योग्य प्रकारे करणेही महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण आपल्या आर्थिक गरजांनुसार गुंतवणूक करतो, तेव्हा आपण त्या पैशांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे, आपल्या आर्थिक गरजांनुसार गुंतवणूक करणे सर्वोत्तम आहे.

जर तुम्हाला कमी कालावधीत पैशांची गरज असेल आणि तुमचे पैसे कमी कालावधीत परिपक्व होऊन त्यावर नफा मिळावा असे वाटत असेल, तर तुम्ही अल्प-मुदतीच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसमार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजना, ज्यामध्ये मुदत ठेव योजनेचा (Fixed Deposit Scheme) समावेश आहे, उत्कृष्ट आहेत.

याचा अर्थ असा की तुम्हाला अल्प मुदतीसाठी पैशांची गरज नाही. तुम्ही भविष्याचा विचार करून गुंतवणूक करत आहात. जर तुम्हाला पुढील 10 ते 20 वर्षांसाठी त्या पैशांची गरज नसेल, तर तुम्ही एसआयपी (SIP) सारख्या दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवू शकता.

अल्पकालीन गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून तात्काळ नफ्याची अपेक्षा करणे आणि भविष्याचा विचार करून अल्पकालीन गुंतवणूक करणे, हे दोन्ही चुकीचे गुंतवणूक नियोजन आहे. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार गुंतवणूक करा. यासाठी जो व्यक्त यामध्ये परिपक्व आहे, त्याचा सल्ला तुम्ही नक्की घ्या.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...