नोकरी बदलल्यानंतर PF चे पैसे ट्रान्सफर करण्याचं टेन्शन विसरा, पैसे नव्या खात्यात पाठवण्यासाठी वाचा सोप्या टिप्स

नोकरदारांच्या आयुष्यात नोकरीचं ठिकाण बदलण्याच्या अनेक वेळा येत असतात. ईपीएओमधील पीएफची रक्कम नव्या खात्यात वर्ग करावी लागते.

नोकरी बदलल्यानंतर PF चे पैसे ट्रान्सफर करण्याचं टेन्शन विसरा, पैसे नव्या खात्यात पाठवण्यासाठी वाचा सोप्या टिप्स
ईपीएफओ
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 11:40 PM

नवी दिल्ली: नोकरदारांच्या आयुष्यात नोकरीचं ठिकाण बदलण्याच्या अनेक वेळा येत असतात. ईपीएओमधील पीएफची रक्कम नव्या खात्यात वर्ग करावी लागते. एखाद्या ठिकाणी नोकरी करताना पगारातून कपात करुन जमा झालेली पीएफची रक्कम ईपीएफओच्या खात्यात जमा होत असते. नव्या कंपनीत रुजू झाल्यानंतर आपल्याला जुन्या कंपनीच्या खात्यातील पीएफ नव्या खात्यात ट्रान्सफर करावा लागतो. ही प्रक्रिया आता सुरळीत झाली आहे. ( How to transfer pf account easily with UAN from old employer passbook to new passbook know easy process)

युएन लिंक असणं गरजेचे

ऑनलाईन पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्याकडे यूएएन अ‌ॅक्टिव्ह आणि पीएफ खात्याशी लिंक असणं गरजेचे असते. यूएएन नंबरद्वारे ईपीएफओच्या पोर्टलवर लॉगीन करुन तुम्ही जुन्या कंपनीत जमा झालेली रक्कम पाहू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम यूएएन पोर्टलवर जाऊन यूएएन अ‌ॅक्टिव्ह करुन घ्यावा लागेल.

इपीएफओचे पैसे ट्रान्सफर कसे करायचे

  1. सगळ्यात आधी EPFO ला यूनिफाईड मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा. इथे यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
  2. लॉगइन केल्यानंतर Online Services वर जा आणि Member-One EPF Account Transfer Request ऑप्शनवर क्लिक करा.
  3. यामध्ये तुम्हाला पर्सनल इन्फोर्मेशन आणि पीएफ अकाऊंट वेरिफाय करावं लागेल.
  4. यानंतर Get Details ऑप्शनवर क्लिक करा.
  5. आता तुमच्याकडे ऑनलाईन क्लेम फॉर्मची पुष्टी करण्यासाठी मागील नियोक्ता आणि वर्तमान नियोक्ता यांच्या दरम्यान निवड करण्याचा पर्याय असेल. तुम्ही अधिकृत सिग्नेटरी होल्डिंग डीएससीच्या उपलब्धतेवर आधारित हे निवडले आहे. दोन मालकांपैकी कोणतेही निवडा आणि सभासद आयडी किंवा यूएएन द्या.
  6. यानंतर सगळ्यात शेवटी Get OTP ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. नंतर ओटीपी सबमिट करा.
  7. ओटीपी वेरिफाय झाल्यानंतर कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रोसेस रिक्वेस्टसाठी जाईल.
  8. ही प्रक्रिया पुढच्या तीन दिवसांत पूर्ण होईल. सगळ्यात आधी कंपनी ती हस्तांतरित करेल. तर ईपीएफओचे फील्ड अधिकारी याची पडताळणी करतील.

ऑफलाईन हस्तांतरणासाठी आपल्याला फॉर्म 13

ओटीपी टाकल्यानंतर आपल्या कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रक्रियेसाठी विनंती केली जाईल. प्रथम कंपनी पैसे हस्तांतरित करेल आणि त्यानंतर ईपीएफओचा फील्ड अधिकारी याची पडताळणी करेल. हस्तांतरण विनंती पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण ट्रॅक क्लेम स्थितीवर आपली स्थिती तपासू शकता. ऑफलाईन हस्तांतरणासाठी आपल्याला फॉर्म 13 भरावा लागेल आणि आपल्या जुन्या किंवा नवीन कंपनीला द्यावा लागेल.

पीएफ ट्रान्सफरमधील अडचणी

एखाद्या कर्मचाऱ्याचे इपीएफओ खात्याचा यूएएन अ‌ॅक्टिव्ह नसेल, नोंदणी केलेला मोबाईल नंबर रजिस्टर नसेल, किंवा आधार कार्डमध्ये नोदंवलेला मोबाईल ईपीएफओमध्ये नसेल तर ईपीएफओची रक्कम जुन्या खात्यातून नव्या खात्यात जमा करताना अडचणी येऊ शकतात. कर्मचाऱ्याचे बँक खाते, आधार कार्ड हे सर्व यूएएन खात्याला लिंक असणं आवश्यक आहे. मागील कंपनीतून जॉब सोडला तेव्हाची डेट ऑफ एक्झिट नोंदवणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या:

आता घर बसल्या PF अकाऊंट ऑनलाईन करा ट्रान्सफर, EPFO ने सांगितली संपूर्ण प्रोसेस

तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा आहेत? या नंबरवर मेसेज करुन एका मिनिटात माहिती मिळवा

( How to transfer pf account easily with UAN from old employer passbook to new passbook know easy process)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.