AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Home treatment : व्हॉट्सअॅप बिल दाखवून विम्याचा दावा करण्याआधी सावधान, ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

कोरोना संसर्गाने अनेकांचं आर्थिक नियोजन बिघडलवं आहे. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून कोरोना उपचाराचा भार पेलण्यासाठी खास कोरोना विमा कवच घेतलं जात आहे.

Corona Home treatment : व्हॉट्सअॅप बिल दाखवून विम्याचा दावा करण्याआधी सावधान, 'या' गोष्टींची काळजी घ्या
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 8:16 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाने अनेकांचं आर्थिक नियोजन बिघडलवं आहे. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून कोरोना उपचाराचा भार पेलण्यासाठी खास कोरोना विमा कवच (Korona Kavach Policy) घेतलं जात आहे. मात्र, प्रश्न इथंच संपत नाही. या कोरोना विमा कवच योजनेत विमा कंपन्यांकडून नागरिकांचा विमा दावा लगेचच स्वीकारला जाईल असंही नाही. त्यात अनेक तांत्रिक बाबी दाखवल्या जात आहे. अशाच बाबी सध्या कोरोना संसर्ग झालेल्या आणि घरीच उपचार घेणाऱ्या विमाकर्त्यांना येत आहेत. विमा कंपन्या या कोरोना रुग्णांचे व्हॉट्सअॅपवरील बिल मान्य करत नाहीये (If you are using WhatsApp bills for Corona Kavach Insurance Policy then read this before claim).

केंद्र सरकारच्या आदेशानुसार IRDAI ने इंश्युरन्स कंपनीला स्पष्ट निर्देश दिले आहेत की सरकारच्या सूचनांप्रमाणे घरीच उपचार घेणाऱ्या (Home treatment) रुग्णांनाही विमा सुरक्षा द्या. रुग्णालयांमधील बेड्सची कमतरता पाहता मध्यंतरीच्या काळात सरकारने नागरिकांना प्राथमिक लक्षणं असताना घरीच उपचार घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच घरगुती उपचारासाठी देखील रुग्णांना विमा सुरक्षा मिळेल, असंही सांगण्यात आलं होतं.

विमा कंपन्यांकडून तांत्रिक बाबी दाखवत विमा दावा स्वीकारण्यास नकार

यानंतर अनेक कोरोना रुग्णांनी घरीच राहून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घेतले. त्यांना डॉक्टरांनी व्हॉट्सअॅपवरच औषधांच्या prescriptions पाठवल्या. त्याचे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केले. मात्र, आता विमा दावा करताना याच गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. विमा कंपन्या यात तांत्रिक बाबी दाखवत विमा दावा नाकारत आहेत. त्यामुळे रुग्णांचं मोठं नुकसान होत आहे. असं असलं तरी विम्याच्या नियमांमध्ये बदलही झाले आहेत.

व्हॉट्सअॅप बिल चालणार नाही

सध्या होम ट्रीटमेंटचाही विम्यात समावेश करण्यात आलाय. कोरोना स्पेशल Corona Kavach Policy लाँच करण्यात आली होती. यात होम ट्रीटमेंट अंतर्गत वेगवेगळ्या तपासण्या, डॉक्टरांची कंसल्टेशन फी, औषधांचे बिल यांचा समावेश करण्यात आलाय. सोशल डिस्टंन्सिंगमुळे डॉक्टरांची औषधांची चिठ्ठी, औषधांचे बिल व्हॉट्सअॅपवरच शेअर केली जातेय. मात्र, विमा कंपन्या हे बिल स्वीकारण्यास नकार देत आहेत.

रुग्णालयांकडून कॅशलेस सुविधेलाही नकार

कोरोना संकटाच्या काळातही अनेक रुग्णालयं कोरोना रुग्णांना कॅशलेस सुविधा देण्यास नकार देत आहेत. हा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि IRDAI पर्यंत पोहचला आहे. यानंतर हे प्रकरण दिल्ली हाईकोर्टातही पोहचलं आहे. कोर्टाने विमा कंपन्यांना 60 मिनिटाच्या आत विमा दाव्यांच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यास सांगितलं आहे. IRDAI रुग्णालयांवर नियंत्रण करत नसल्यानं यात अनेक रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा :

Corona Kavach Policy: कोरोना कवच पॉलिसी काय आहे? वाचा प्रीमियम आणि विम्याबाबत सर्व काही…

Alert! जर नाही भरला ‘हा’ फॉर्म तर LIC मध्ये अडकतील पूर्ण पैसे, वाचा सविस्तर

दिवसाला 28 रुपये खर्च करून मिळवा 2 लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे LIC ची खास योजना

व्हिडीओ पाहा :

If you are using WhatsApp bills for Corona Kavach Insurance Policy then read this before claim

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.