AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय अर्थव्यवस्था 2021 मध्ये चीनला धोबीपछाड देणार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

पुढील वर्ष म्हणजेच 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल आणि चीनलाही धोबीपछाड देईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्तवला आहे.

भारतीय अर्थव्यवस्था 2021 मध्ये चीनला धोबीपछाड देणार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 13, 2020 | 10:39 PM
Share

वॉशिंग्टन : भारतीय अर्थव्‍यवस्‍थेसाठी यंदाचं वर्ष कोरोना आणि त्यानंतर लागू लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाईट असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. असं असलं तरी पुढील वर्ष म्हणजेच 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल आणि चीनलाही धोबीपछाड देईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्तवला आहे. मागील आठवड्यात जागतिक बँकेने भारताचं सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच जीडीपी या वर्षी 9.6 टक्क्यांपर्यंत घटेल असं म्हटलं होतं. याशिवाय मूडीजसह इतर अनेक मोठ्या रेटिंग संस्थांनी आधीच जीडीपीमध्ये घट होईल, असा अंदाज वर्तवला आहे (IMF GDP Forecast for Indian Economy and China amid Corona Lockdown situation).

10.3 टक्क्यांची मोठी घट

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार (IMF) कोरोना विषाणूमुळे परिणाम झालेली भारतीय अर्थव्यवस्थेत यावर्षी 10.3 टक्क्यांची मोठी घट होण्याचा अंदाज आहे. मात्र, 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेऊन 8.8 टक्क्याने वाढेल. भारतीय अर्थव्यवस्था चीनलाही मागे टाकून वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा पुन्हा एकदा मिळवेल, असंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं आहे.

आयएमएफनुसार, चीनची अर्थव्यवस्था 2021मध्ये 8.2 टक्क्यांच्या वाढीपर्यंत जाऊ शकेल. दुसरीकडे 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 8.8 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. मागील वर्षी भारताचा आर्थिक विकासाचा दर 4.2 टक्के इतका राहिला होता.

जागतिक अर्थव्यवस्थेत 4.4 टक्क्यांची घट

आयएमएफच्या ताज्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत जवळपास 4.4 टक्क्यांची घट पाहायला मिळणार आहे. 2021 मध्ये 5.2 टक्क्यांच्या वाढीसह जागतिक अर्थव्यवस्था पुढे जाईल, असा अंदाज आहे. आयएमएफच्या अहवालानुसार वर्ष 2020 मध्ये जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी केवळ चीनच्याच अर्थव्यवस्थेत 1.9 टक्क्यांची वाढ होईल.

संबंधित बातम्या :

आधी मांडलेलं बजेट आता उपयोगी ठरणार नाही, जूनमध्ये नव्याने पुरवणी बजेट मांडा : पृथ्वीराज चव्हाण

‘लॉकडाऊननंतर भारताची स्थिती कशी असेल? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

मोदी सरकार आणि समर्थकांना देशातील गडबड-पडझड मान्य आहे का? : सामना

IMF GDP Forecast for Indian Economy and China amid Corona Lockdown situation

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ