आयकर विभागाने 11 ऑक्टोबरपर्यंत करदात्यांना पाठवले 84,781 कोटी, तुमच्या खात्यात पैसे आले का?

आयकर विभागाने ट्विट करून म्हटले आहे की, "सीबीडीटीने 1 एप्रिल 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान 59.51 लाखांहून अधिक करदात्यांना 84,781 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली. 57,83,032 प्रकरणांमध्ये 22,214 कोटी रुपयांचा आयकर परतावा जारी करण्यात आला

आयकर विभागाने 11 ऑक्टोबरपर्यंत करदात्यांना पाठवले 84,781 कोटी, तुमच्या खात्यात पैसे आले का?

नवी दिल्ली : आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 11 ऑक्टोबरपर्यंत 59.51 लाखांहून अधिक करदात्यांना 84,781 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान केलेल्या परताव्यासाठी आहे. यातील वैयक्तिक आयकर परतावा 22,214 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा कर परतावा 62,567 कोटी रुपये होता.

करदात्यांना 84,781 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत

आयकर विभागाने ट्विट करून म्हटले आहे की, “सीबीडीटीने 1 एप्रिल 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान 59.51 लाखांहून अधिक करदात्यांना 84,781 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली. 57,83,032 प्रकरणांमध्ये 22,214 कोटी रुपयांचा आयकर परतावा जारी करण्यात आला आणि 1,67,718 प्रकरणांमध्ये 62,567 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा जारी करण्यात आला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आयकर विभागाने 2.38 कोटी करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपयांचे कर परतावे जारी केले होते. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जारी 1.83 लाख कोटी रुपयांच्या परताव्यापेक्षा हे 43.2 टक्के अधिक आहे.

नवीन पोर्टलवर दोन कोटींहून अधिक ITR दाखल

त्याच वेळी प्राप्तिकर विभागाने गुरुवारी सांगितले की, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत दोन कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आलेत आणि नवीन आयटी पोर्टलच्या कामगिरीशी संबंधित समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवण्यात आल्यात. सीबीडीटीने करदात्यांना 2020-21 (एप्रिल 2020-मार्च 2021) या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र लवकरात लवकर भरण्याचे आवाहन केले आणि असे म्हटले की, सर्व आयटीआर ई-फायलिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेत.

1.70 कोटी ITR ची ई-पडताळणी झाली

सीबीडीटीने म्हटले आहे की, 2021-22 आर्थिक वर्षासाठी नवीन पोर्टलवर दाखल केलेल्या दोन कोटींपेक्षा जास्त आयटीआरमध्ये आयटीआर -1 आणि 4 86 टक्के आहेत. यापैकी 1.70 कोटीहून अधिक परताव्याचे ई-पडताळणी देखील करण्यात आले आहे. यापैकी 1.49 कोटी रिटर्न आधार कार्ड आधारित वन टाइम पासवर्ड (OTP) द्वारे पडताळणी करण्यात आलेत. आधार कार्ड OTP आणि इतर पद्धतींद्वारे ई-पडताळणीची प्रक्रिया विभागाला ITR ची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि परतावा जारी करण्यासाठी आवश्यक आहे.

36 लाखांहून अधिक परतावा जारी केला

सत्यापित ITR-1 आणि 4 पैकी 1.06 कोटीहून अधिक ITR वर प्रक्रिया करण्यात आलीय. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी 36.22 लाखांहून अधिक परतावा जारी करण्यात आलाय. ITR-2 आणि 3 ची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. नवीन पोर्टल 7 जून 2021 रोजी सुरू करण्यात आले आणि सुरुवातीच्या काळात करदात्यांनी पोर्टलच्या कामकाजात अनियमितता नोंदवली होती. सीबीडीटीने सांगितले की, अनेक तांत्रिक समस्या सोडवण्यात आल्यात आणि पोर्टलची कामगिरी बऱ्याच प्रमाणात स्थिर झालीय. बोर्डाने सांगितले की, 13 ऑक्टोबरपर्यंत 13.44 कोटींपेक्षा जास्त करदात्यांनी लॉगिन केलेय आणि सुमारे 54.70 लाख करदात्यांनी त्यांचे पासवर्ड पुनर्प्राप्त करण्याची सुविधा घेतलीय.

‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करून दरमहा तुमच्या खात्यात पैसे येणार, व्याजदर काय?

सोन्याचे भाव वाढले, चांदीसुद्धा महागली; पटापट तपासा ताजे दर

Income tax department sent Rs 84,781 crore to taxpayers till October 11, did you get the money in your account?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI