AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Borana Weaves  IPO :आताच पैसे तयार ठेवा, जबरदस्त IPO आला, नशीब उजळल्यास पडणार पैशांचा पाऊस?

कधी एकदा नवा आयपीओ येतो, याची गुंतवणूकदार वाट पाहात असतात. आता ही प्रतीक्षा संपली आहे. Borana Weaves या कारण टेक्स्टाईल कंपनीचा आयपीओ कधी येणार हे समोर आले आहे.

Borana Weaves  IPO :आताच पैसे तयार ठेवा, जबरदस्त IPO आला, नशीब उजळल्यास पडणार पैशांचा पाऊस?
NEW IPO UPDATE
| Updated on: May 15, 2025 | 5:37 PM
Share

Borana Weaves  IPO : कधी एकदा नवा आयपीओ येतो, याची गुंतवणूकदार वाट पाहात असतात. आता ही प्रतीक्षा संपली आहे. Borana Weaves या कारण टेक्स्टाईल कंपनीचा आयपीओ कधी येणार हे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 20 मे 2025 रोजी या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांना 19 मे रोजी पैसे गुंतवता येतील. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला एकूण 144.89 कोटी रुपयांची उभारी करायची आहे.

 आयपीओचा किंमत पट्टा काय?

Borana Weaves कंपनीचा हा आयपीओ फ्रेश इक्विटी शेअर्सचा असणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून एकूण 67 लाख शेअर्ज जारी करण्यात येणार आहेत. या आयपीओत 75 शेअर्स हे क्वालिफाईड इन्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव आहे. 15 टक्के गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाटी तर 10 टक्के हिस्सा हा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा (प्राईस बँड) 205 रुपये ते 216 रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 69 शेअर्स असतील.

कमीत कमी किती रुपये गुंतवावे लागणार?

म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी 14,904 रुपये गुंतवावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉट म्हणजेच 897 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओत कमीत कमी 1,93,752 रुपयांची गुंतवणूक करू शकतात.

कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध कधी होणार?

या आयपीओत येत्या 22 मेपर्यंत गुंतवणूक करता येईल. 23 मे रोजी शेअर्सचे वाटप होईल. 26 मेपर्यंत शेअर्स डी-मॅट खात्यात जमा होतील. त्यानंतर 27 मे रोजी ही कंपनी बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध होणार आहे.

कंपनी पैशांचं काय करणार?

दरम्यान, आयपीओच्या माध्यमातून उभ्या केलेल्या पेशांचा उपयोग कंपनी आपला विस्तार करण्यासाठी करणार आहे. या कंपनीकडून गुंजरातमधील सुरत येथे नवे मॅन्यूफॅक्चरिंग युनिट उभे केले जाणार आहे. ग्रॅ फॅब्रिकचे उत्पादन वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. सोबतच कंपनीच्या इतर कामांसाठीही हा पैसा वापरण्यात येणार आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.