IRCTC चा मोठा निर्णय; खासगी कंपन्यांना लवकरच मिळणार थीम आधारित रेल्वे चालवण्याची परवानगी

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) लवकरच भारत गौरव ट्रेन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गंत खासगी कंपन्यांना देखील रेल्वे चालवता येणार आहेत. एका विशिष्ट थीमवर आधारीत रेल्वे चालवण्यासाठी खासगी कंपन्यांना परवानगी देण्यात येणार आहे.

IRCTC चा मोठा निर्णय; खासगी कंपन्यांना लवकरच मिळणार थीम आधारित रेल्वे चालवण्याची परवानगी

नवी दिल्ली : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) लवकरच भारत गौरव ट्रेन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गंत खासगी कंपन्यांना देखील रेल्वे चालवता येणार आहेत. एका विशिष्ट थीमवर आधारीत रेल्वे चालवण्यासाठी खासगी कंपन्यांना परवानगी देण्यात येणार असून, थीमसाठी रेल्वेचे अंतर आणि प्रवाशांकडून कीती भाडे आकारायचे हे ठरवण्याचा अधिकार कंपन्यांना देण्यात आला आहे. मात्र तरी देखील खासगी कंपन्यांच्या भाडे वसुलीवर भारतीय रेल्वे विभागाचे नियंत्रण असणार आहे. लवकरच या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली आहे.

खासगी कंपन्यांसोबत बैठक

ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आयआरसीटीसीकडून तयारी देखील सुरू झाली आहे. आयआरसीटीसीने या प्रकल्पात गुंतवणूक करू इच्छिनाऱ्या कंपन्यांसोबत बैठक देखील घेतली. या बैठकीमध्ये थीम कशाप्रकारच्या असाव्यात, भाडे करार कसा असावा, प्रवाशांना काय सुविधा देण्यात याव्यात? संभाव्य प्रोजेक्टचे फायदे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात संबंधित कंपन्यांसोबत आणखी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यानंतरच योजनेचे स्वरूप स्पष्ट होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

2023 पर्यंत देशात धावणार खासगी ट्रेन?

दरम्यान एका विशिष्ट थिमवर आधारित खासगी ट्रेनप्रमाणेच प्रवाशांसाठी देखील खासगी ट्रेन चालवण्याचा विचार सुरू आहे. खासगी ट्रेन वाहतुकीसाठी येत्या जुलैपर्यंत विविध कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. सुरुवातीला मुंबई दिल्ली मार्गावर खासगी ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 2023 पर्यंत देशात काही प्रमाणात खासगी ट्रेन धावतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

घर नको पण अटी आवर; साधा पंखा असला तरी मिळणार नाही ‘पंतप्रधान आवास’चा लाभ

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे भाव

आता नोकरी सोडतानाही बसणार आर्थिक फटका; … तर तुमच्या वेतनावर लागणार जीएसटी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI