बेरोजगारांसाठी खुशखबर! नोकऱ्यांच्या संधींमध्ये 43 टक्क्यांची वाढ

गेल्या काही महिन्यांमध्ये रोजगारामध्ये वाढ झाली असून, बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विषेत: आयटी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

बेरोजगारांसाठी खुशखबर! नोकऱ्यांच्या संधींमध्ये 43 टक्क्यांची वाढ
देशात लवकरच नव्या कामगार नियमांची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची कमाल कालमर्यादा 12 तासांपर्यंत वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा सुरु होती. यावरुन अनेक उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात होते. सध्याच्या नियमांनुसार कामाची कमाल मर्यादा 10.5 तास इतकी आहे. 1 ऑक्टोबरपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होऊ शकते.
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 11:37 AM

नवी दिल्ली- जगासह देशामध्ये कोरोनाने थैमान घातले होते. मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून, रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दुसरीकरे लसीकरण देखील वाढल्याने, सर्वच उद्योगधंदे पुन्हा एकदा नव्या दमाने सुरू झाले आहेत. याचाच परिणाम म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये रोजगारामध्ये देखील लक्षणीय वाढ झाली असून, बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विषेत: आयटी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात नोकरींच्या जाहिरातींमध्ये वार्षीक आधारावर 43 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

याबाबत नुकताच नोकरी जॉबस्पीकच्या वतीने एक अवाहाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार देशभरात रोजगाराच्या संधी वाढत असून, कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करत आहेत. अशा प्रकारच्या जाहिरातींची संख्या वार्षिक आधारावर 43 टक्क्यांनी वाढली आहे.  ऑक्टोबर 2021 मध्ये  जवळपास देशभरातील 2523 कंपन्यांनी कर्मचारी भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली होती. तर गेल्या सप्टेंबर महिन्यात हेच प्रमाण 2753 एवढे होते. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेमध्ये जरी जाहिरातींमध्ये काही प्रमाणात घट झाली असली, तरी देखील हे प्रमाण वार्षीक आधारावर 43 टक्के एवढे वाढले आहे.

सर्वाधिक संधी आयटी क्षेत्रात 

या अहवालानुसार नोकरीच्या सर्वाधिक संधी या आयटी क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. आयटी क्षेत्रामध्ये या काळात वार्षिक आधारावर तब्बल 85 टक्के नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून, त्या खोलोखाल इ-कॉमर्स क्षेत्राचा नंबर लागला आहे. इ-कॉमर्स क्षेत्रात देखील 51 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे आता लॉकडाऊन शिथील करण्यात आल्याने सर्व उद्योगधंदे आणि हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने या क्षेत्रात देखील नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. दुसरीकडे  शिक्षण क्षेत्रात जवळपास 41 टक्के रोजगारांच्या संधी वाढल्याचे या अहवालामधून समोर आले आहे.

9.3 टक्के वेतनवाढीचा अंदाज

एका रिपोर्टनुसार 2022 मध्ये भारतीय  कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सरासरी 9.3 टक्के वेतनवाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षापासून देशावर कोरोना संकट होते. परिणामी सर्व व्यवाहार ठप्प झाले. परंतु आता देश कोरोनातून सावरत असून, आगामी काळात नोकरीच्या आणखी संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी भरघोस पगारवाढ देऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सबंधित बातम्या 

युनियन बँक ऑफ इंडियाचा नफा तिप्पट वाढला, उत्पन्नातही फायदा

बँक ऑफ इंडियाचा धमाका, दुसऱ्या तिमाहीत नफ्यात 100% वाढ, NPA घटला

धनत्रयोदशीला सोन्याचे भाव वाढले, चांदीही महागली, पटापट तपासा नवे दर

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.