विक्री होण्यापूर्वीच जस्ट डायल मालामाल, काही तासात कमावले 539 कोटी रुपये

सोमवारी बीएसईतील जस्ट डायलच्या समभागात व्यापार सत्रात 10 टक्क्यांची वाढ नोंदली गेली. कंपनीचा शेअर 963 रुपयांवर पोहोचला आहे. (Just dial in highly profit before the sale, earning Rs 539 crore in a few hours)

विक्री होण्यापूर्वीच जस्ट डायल मालामाल, काही तासात कमावले 539 कोटी रुपये
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये मिळणार वाढीव पगार
prajwal dhage

|

Mar 08, 2021 | 5:02 PM

मुंबई : टाटा समूह डिजिटल मार्केटमध्ये पाय रोवण्याची तयारी करत आहे. प्रथम सुपर अ‍ॅप आणि आता अशी चर्चा आहे की ई-कॉमर्स मार्केटमध्ये विस्तार करण्यासाठी कंपनी जस्ट डायल खरेदी करण्याचा विचार करीत आहे. तथापि, याबाबत व्यवहारीक चर्चा सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. परंतु जस्ट डायल आणि त्याच्या गुंतवणूकदारांना या बातमीचा सर्वाधिक फायदा झाला आहे. सोमवारी बीएसईतील जस्ट डायलच्या समभागात व्यापार सत्रात 10 टक्क्यांची वाढ नोंदली गेली. कंपनीचा शेअर 963 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी शुक्रवारी जस्ट डायलचा शेअर 876 रुपयांवर बंद झाला होता. पण सोमवारी टाटाच्या या बातमीने कंपनीला मालामाल केले आहे. अवघ्या काही तासांत कंपनीची मार्केट कॅप 539 कोटी रुपयांनी वाढली आहे. (Just dial in highly profit before the sale, earning Rs 539 crore in a few hours)

अशी मालामाल झाली जस्ट डायल

शुक्रवारी जस्ट डायलचा शेअर 876 रुपयांवर बंद झाल्यानंतर सोमवारी कंपनीच्या शेअरमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली. शेअर्सच्या या वेगवान वाढीमुळे कंपनीची मार्केट कॅप 539 कोटी रुपयांनी वाढली. सोमवारी एक बातमी आली की, टाटा समूह जस्ट डायल खरेदी करण्याच्या संभावना आहेत. या कराराद्वारे टाटा सन्सची विलीनीकरण आणि अधिग्रहण टीम संभाव्य भागीदारीची एक यादी तयार करीत आहे, ज्यामुळे टाटा डिजिटलला ऑनलाईन ग्राहक बाजारात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारी पोहोच आणि मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करु शकेल. या बातमीनंतर, जस्ट डायलच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे.

जस्ट डायल हा फायदेशीर करार

मार्केट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, टाटासाठी जस्ट डायल हा फायदेशीर करार आहे. कारण कंपनीवर कोणतेही कर्ज नाही आणि कंपनीची मार्केट कॅप 5961 कोटींपेक्षा जास्त आहे. सन 1996 मध्ये सुरू झालेली ही कंपनी आज डिजिटल बाजारात अग्रणी कंपनी म्हणून पाहिली जाते. वर्ष 2013 साली जस्ट डायल स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली. कंपनी सतत नफ्याची नोंद करीत आहे. त्याचबरोबर या कराराच्या माध्यमातून टाटा समूह डिजिटल ई-कॉमर्स व्यवसायातील आपली पकड आणखी मजबूत करण्याचा विचार करीत आहे. टाटा समूह ग्रॉसरी, फार्मसी, डेअरी, लाईफस्टाईल, शिक्षण, वैद्यकीय सल्लामसलत, सौंदर्य, लॉजिस्टिक्स, विमा आणि पेमेंट पर्याय, ग्राहक वित्त अशा क्षेत्रात डिजिटल वर्टिकल्स तयार करीत आहे. (Just dial in highly profit before the sale, earning Rs 539 crore in a few hours)

इतर बातम्या

ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचं नाव दिलं जाणार, पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी मान्य

आधी प्रेमविवाह, आठ वर्षांचा मुलगाही, तरीही भल्या पहाटे क्षुल्लक कारणावरुन पतीची निर्घृण हत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें