AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बचतीसोबत मिळवा संरक्षण, LIC च्या ‘या’ विमा पॉलिसी जाणून घ्या

तुम्ही वर्किंग पर्सन असाल तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या काही पॉलिसींबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसोबतच इन्शुरन्सचा ही फायदा मिळू शकतो. चला जाणून घेऊया.

बचतीसोबत मिळवा संरक्षण, LIC च्या ‘या’ विमा पॉलिसी जाणून घ्या
LIC Post Office
| Edited By: | Updated on: Jul 25, 2025 | 2:59 PM
Share

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी ही भारतातील अत्यंत लोकप्रिय आणि मोठी आयुर्विमा कंपनी आहे. एलआयसी आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या पॉलिसी ऑफर करते, ज्यामध्ये लोक सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकतात. विम्याचा लाभही तुम्हाला मिळून मिळू शकतो. जर तुम्ही वर्किंग पर्सन असाल तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या काही पॉलिसींबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसोबतच इन्शुरन्सचा ही फायदा मिळू शकतो. चला जाणून

एलआयसी जीवन आनंद पॉलिसी

एलआयसी जीवन आनंद पॉलिसी ही टर्म प्लॅन आहे, जी कमी प्रीमियम असलेल्या लोकांना चांगला परतावा देते. या पॉलिसीमध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक 1358 रुपयांच्या मासिक प्रीमियमसह सुरू करू शकता. आपण आपल्या सोयीनुसार 15 ते 35 वर्षांसाठी प्रीमियम भरू शकता. एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये बोनस देखील मिळतो, परंतु यासाठी तुम्हाला ही पॉलिसी 15 वर्ष सुरू ठेवावी लागेल.

एलआयसी जीवन आझाद पॉलिसी

एलआयसी जीवन आझाद पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक योजना आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला 15 ते 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. या पॉलिसीची कमीत कमी विमा रक्कम 2 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 5 लाख रुपये आहे. पॉलिसी संपल्यानंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला नाही तर विम्याची संपूर्ण रक्कम पॉलिसीधारकाला दिली जाते. ही पॉलिसी 90 दिवसांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावावरही गुंतवता येते.

एलआयसी जीवन उमंग पॉलिसी

एलआयसी जीवन उमंग पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, सहभागी आणि संपूर्ण जीवन विमा योजना आहे. ही पॉलिसी 100 वर्षांपर्यंत कव्हर देते. त्याचबरोबर पॉलिसीधारकाला प्रीमियम भरण्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उत्पन्नही मिळते. या पॉलिसीमध्ये कमीत कमी 2 लाख रुपयांपर्यंतविमा करावा लागतो.

पुढील योजनांमध्ये कोणताही धोका नसतो. अशा वेळी आपले पैसे गमावण्याची भीती नाही. चला जाणून घेऊया.

पीपीएफ योजना

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दरवर्षी थोडी फार गुंतवणूक करून चांगला फंड गोळा करू शकता. पीपीएफ योजनेत वार्षिक 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा आहे. तर या योजनेत तुम्हाला 7.1 टक्के परतावा मिळतो. जर तुम्ही या योजनेत दरमहा 500 रुपये म्हणजेच 15 वर्षांसाठी वर्षभरात 6000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 1,62,728 रुपये मिळतील. येथे तुम्ही एकूण 90,000 रुपयांची गुंतवणूक कराल. यामध्ये तुम्हाला जवळपास 72,000 रुपयांचा नफा मिळेल.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम

पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक दरमहा 500 रुपयांपासून सुरू करू शकता. या योजनेत तुम्हाला 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. आरडी योजनेचे व्याजदर 6.7 टक्के आहेत. यामध्ये तुम्ही 5 वर्षात एकूण 30,000 रुपयांची गुंतवणूक कराल, त्यानंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 35,681 रुपये मिळतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!