LIC Policy : दरमहा अवघ्या 500 रुपयांच्या बचतीवर 2 लाखांपर्यंत परतावा, नेमकी योजना काय?

एलआयसीनं कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांसाठी आधारस्तंभ विमा पॉलिसी आणली आहे. lic aadhar stambh policy

LIC Policy : दरमहा अवघ्या 500 रुपयांच्या बचतीवर 2 लाखांपर्यंत परतावा, नेमकी योजना काय?
मुलीच्या नावे दररोज केवळ 125 रुपये करा जमा, लग्नाच्या वेळी एकरकमी मिळतील 27 लाख रुपये
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 7:04 PM

नवी दिल्ली: भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांसाठी विमा पॉलिसी आणली आहे. त्या पॉलिसीचं नाव आधारस्तंभ आहे. ही पॉलिसी केवळ पुरुषांसाठी असून यामध्ये ऑटो कवरची सुविधा देखील आहे. पॉलिसी काढताना वैद्यकीय चाचणी देखील करावी लागत नाही. (lic started aadhar stambh policy for only men deposit rs 500 monthly and get 2 lacs)

पुरुषांसाठी आधारस्तंभ तर महिलांसाठी आधारशिला

देशातील कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी एलआयसीच्या या दोन पॉलिसी फायदेशीर आहेत. कमी उत्पन्न मिळवणारे किंवा ज्यांनी कमाईला सुरुवात केली आहे. त्यांच्यासाठी ही पॉलिसी फायदेशीर आहे. एखादा पॉलिसीधारक काही कारणांमुळे प्रीमियम भरू शकला नाहीतर यामध्ये ऑटो कवरची देखील सोय आहे. मात्र, पॉलिसी तीन वर्षांपासून सुरु असली पाहिजे. तीन वर्षांपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा पॉलिसी कमी वेळ सुरु असेल तर 6 महिन्यांचा ऑटो कव्हर मिळतो. पॉलिसी 5 वर्षांपेक्षा जास्त काळ सुरु असल्यास 1 वर्षांचा ऑटो कव्हर मिळतो.

पॉलिसी कोण घेऊ शकत?

आधारस्तंभ रेग्युलर प्रीमियम पेमेंट पॉलिसी आहे. त्यामुळे जितक्या वर्षांसाठी पॉलिसी घेतली असेल तितक्या वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर लॉयल्टी अ‌ॅडिशन आणि विमा घेतलेली रक्कम एकत्रितपणे मिळते. ही पॉलिसी 8 ते 55 वर्ष वय असणारे नागरिक घेऊ शकतात. ही पॉलिसी कमीत कमी 10 ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेता योते. ही पॉलिसी 75 हजारांपासून ते 3 लाखांपर्यंत घेऊ शकता. या पॉलिसीचा प्रीमियम दरमहा, तिमाही, सहा महिने आणि वार्षिक अशा प्रकारे भरता येतो. या पॉलिसीतून मिळणाऱ्या लाभावर प्राप्तिकर विभागाच्या 80 सी अंतर्गत सूट मिळते.

500 रुपयांची गुंतवणूक 2 लाख रुपयांपर्यंत फायदा

एखाद्या व्यक्तीनं आधारस्तंभ पॉलिसी वयाच्या 40 व्या वर्षी घेतली आहे. त्यानं दीड लाख रुपयांच्या रकमेचं संरक्षण घेतलं आहे. संबंधित व्यक्ती 20 वर्षांसाठी दरमहा 500 रुपये भरते. याप्रकारे प्रीमियम स्वरुपात 1 लाख 20 हजार रुपये भरेल. पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर त्याला विमा संरक्षण घेतेलीली रक्कम 1.5 लाख रुपये आणि लॉयल्टी अ‌ॅडिशन 48 हजार 750 रुपये मिळतील. दोन्हीची एकूण रक्कम 1 लाख 98 हजार 750 रुपये होते.

पॉलिसी कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास

पॉलिसी घेतल्यापासून 20 वर्षांच्या कालावधी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 1.5 लाख रुपये आणि लॉयल्टी अ‌ॅडिशन रक्कम मिळेल.

संबंधित बातम्या:

LIC Policy : दरमहा अवघ्या 800 रुपयांच्या गुंतवणुकीत 5 लाखांपर्यंत परतावा, नेमकी योजना काय?

LIC Pension Scheme: हरेक महिन्याला थेट 10 हजारांपर्यंत पेन्शन; मॅच्युरिटीवर व्याजासह मिळणार जबरदस्त फायदा

(lic started aadhar stambh policy for only men deposit rs 500 monthly and get 2 lacs)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.