AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nadia Chauhan : रसाळ आंब्यांमुळे मोठी कमाई, नादिया चौहान यांनी पोहचवला ब्रँड घरोघरी

Nadia Chauhan : ताज्या आणि रसाळ आंब्यांमुळे या कंपनीने मोठी कमाई केली. नादिया चौहान या यांच्या धोरणामुळे हा ब्रँड 300 कोटींहून 8,000 कोटी रुपयांवर पोहचला. कोणता आहे हा ब्रँड

Nadia Chauhan : रसाळ आंब्यांमुळे मोठी कमाई, नादिया चौहान यांनी पोहचवला ब्रँड घरोघरी
| Updated on: Jul 08, 2023 | 6:23 PM
Share

नवी दिल्ली : देशात अनेक लोकप्रिय ब्रँड्स (Brands) आहेत. ते खूप यशस्वी आहेत. त्यांना प्रत्येक भारतीय ओळखतो. काही जण तर या ब्रँडचे निस्सीम चाहते आहे. पण हा ब्रँड यशस्वी करण्यासाठी कोण मेहनत घेतं, हे आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती असतं. हा ब्रँड यशस्वी, लोकप्रिय करण्यासाठी अनेक हात झटत असतात. तर काही खास लोकांमुळे तो बाजारात सुपरहिट होतो. त्यामागे कोणत्या तरी व्यक्तीचे व्हिजन असते. ताज्या आणि रसाळ आंब्यांमुळे या कंपनीने मोठी कमाई केली. नादिया चौहान (Nadia Chauhan) या यांच्या धोरणामुळे हा ब्रँड 300 कोटींहून 8,000 कोटी रुपयांवर पोहचला. कोणता आहे हा ब्रँड? त्याच्या यशामागे सूत्रधार असलेल्या कोण आहेत नादिया चौहन?

Mango Frooti मँगो फ्रूटी, स्पेशल ज्युसी आणि अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. ही कंपनी ताज्या आणि रसाळ आंब्याचा रस तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा दावा करते. फ्रूटी हा ब्रँड आता आबालवृद्धापर्यंत लोकप्रिय आहे. पारले एग्रो कंपनीचा हा ब्रँड आहे. पण ब्रँड घरोघरी पोहचविण्यामागे नादिया चौहान यांचे कष्ट आहेत. नादिया चौहान यांनी कंपनीचे मार्केट 300 कोटींहून 8,000 कोटी रुपयांपर्यंत पोहचवले.

48% हिस्सा फ्रूटी आज रुग्णालयापासून ते अनेक स्थानिक कार्यक्रमात आवर्जून दिसते. लहान मुलांमध्ये हा ब्रँड विशेष लोकप्रिय आहे. एकट्या पारले एग्रोच्या विक्रीत फ्रूटीचा वाटा जवळपास 48 % इतका आहे.

कोण आहेत नादिया चौहान कॅलिफोर्नियातील एका व्यावसायिक कुटुंबात नादियाचा जन्म झाला. पण त्यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांनी एचआर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी घेतली. त्यानंतर 2003 मध्ये 17 वर्षांची असताना तिने वडिलांच्या कंपनीची जबाबदारी खाद्यांवर घेतली. पारले एग्रो कंपनीत ती सहभागी झाली. 1929 मध्ये तिचे पणजोबा मोहनलाल चौहान यांनी ही कंपनी स्थापन केली होती. कंपनीने 1959 मध्ये शीतपेय उद्योगात पाऊल ठेवले होते.

नादियाने केले प्रयोग नादिया 2003 मध्ये पारले एग्रोत सहभागी झाली. त्यावेळी ती 17 वर्षांची होती. त्यावेळी कंपनी केवळ फ्रूटीची विक्री करत होती. कंपनीच्या विक्रीत या ब्रँडची हिस्सेदारी 95% होती. नादिया यांनी एकाच उत्पादनावर कंपनी चालविण्याचा धोका ओळखला. तिने उत्पादनात विविधता आणण्याची योजना आखली. एक नंतर एक उत्पादन बाजारात आली. पॅकेजड वॉटर ब्रँड बेलीज त्याचाच एक भाग होता. हा प्रयोग हिट ठरला. हा 1,000 हजार कोटींचा ब्रँड ठरला. इतर ही अनेक ब्रँड बाजारात आणण्यात आले.

कंपनी सुसाट नवीन बदलामुळे कंपनीचा टर्नओव्हर वाढला. कंपनी सूसाट धावली. पारले एग्रोचा टर्नओव्हर 300 कोटींहून 8,000 कोटी रुपयांपर्यंत पोहचवले. अप्पी फिज हा ब्रँड 2005 मध्ये सुरु केला होता. हा ब्रँडही बाजारात लोकप्रिय ठरला. त्याची उलाढाल 5,000 कोटी रुपयांवर पोहचली.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.