Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Future Retail : या दिवाळखोरीतील कंपनीसाठी, 49 कंपन्यांसह रिलायन्सचे ‘डावपेच’! कोण मारणार आता बाजी

Future Retail : कधी काळी संपूर्ण भारतात रिटेल क्षेत्रातील किंग असणाऱ्या फ्युचर ग्रुपचे भविष्य लवकरच पालटू शकते. हा समूह ताब्यात घेण्यासाठी एकूण 50 कंपन्या स्पर्धक ठरल्या आहेत. त्यात मुकेश अंबानी यांची रिलायन्सचा ही सहभाग आहे.

Future Retail : या दिवाळखोरीतील कंपनीसाठी, 49 कंपन्यांसह रिलायन्सचे 'डावपेच'! कोण मारणार आता बाजी
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 6:37 PM

नवी दिल्ली : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या किशोर बियाणी यांच्या (Kishore Biyani) फ्युचर रिटेल लिमिटेडला (Future Retail Ltd) ताब्यात घेण्यासाठी बाजारात तीव्र स्पर्धा आहे. एकूण 50 कंपन्या मैदानात उतरल्या आहेत. यामध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाचाही समावेश आहे.  रिटेल किंग असणारे किशोर बियाणी यांची बाजारावर जोरदार पकड होती. हा समूह रिटेल क्षेत्रातील दादा मानल्या जायचा. पण काळाचे फासे पलटले. लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असलेला हा ग्रुप जमिनीवर आला. या समूहाचे दिवाळे निघाले. त्यानंतर अनेकदा हा समूह विक्रीचे प्रयत्न झाले. पण अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तसेच न्यायालयीन डावपेचांमुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

या कंपन्या मैदानात फ्युचर रिटेल कंपनी ताब्यात घेण्यासाठी रिलायन्ससह एकूण 49 कंपन्या मैदानात आहेत. डब्ल्यूएचस्मिथ ट्रॅव्हल्स लिमिटेड (WHSmith Travel Limited), जिंदल पॉवर लिमिटेड (Jindal Power Limited), जेसी फ्लावर्स ॲसेट रिकंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (JC Flowers Asset Reconstruction Private Limited), गोर्डन ब्रदर्स (Gordon Brothers) यांची कंसोर्टियम और सहारा एंटरप्राइजेज (Sahara Enterprises) यासह अनेक कंपन्या हा ग्रुप खरेदीसाठी स्पर्धेत आहेत. यापूर्वी पण हा प्रयोग झाला होता. त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.

यादी केली जाहीर फ्यूचर रिटेलने त्या कंपन्यांची यादी जाहीर केली आहे, ज्यांनी रिझॉल्यूशन प्लॅन सादर करण्यात रस दाखवला. कंपनीने फायलिंगमध्ये याविषयीची माहिती दिली. यामुळे सोमवारी कंपनीच्या शेअरमध्ये 4.17 टक्क्यांची तेजी दिसून आली. कंपनीने अप्पर सर्किट लावले. गेल्या महिन्यात कंपनी एक खुलासा केला. त्यानुसार, किशोर बियाणी यांनी कार्यकारी संचालक पदाचा दिलेला राजीनामा परत घेतला आहे. ते या पदावर कायम असतील. कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. रिझॉल्युशन प्रोफेशनल यांनी बियाणी यांच्या राजीनाम्यातील मजकूरावर आक्षेप नोंदवला होता आणि राजीनामा मागे घेण्यास सांगितला होता.

हे सुद्धा वाचा

रिलायन्ससोबतच्या कराराला ब्रेक फ्युचर ग्रुपने ऑगस्ट 2020 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी (Reliance Industries) रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडसह (RRVL) 24,713 कोटी रुपयांचा एक करार केला. या करारानुसार, रिटेल, होलसेल आणि लॉजिस्टिकमध्ये सध्या सक्रिय फ्युचर ग्रुपच्या 19 कंपन्यांना रिलायन्स रिटेलने खरेदी केले आहे. परंतु, अमेरिकेची दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने (Amazon) या प्रक्रियेला आक्षेप घेतला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहचले होते. त्यामुळे गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात रिलायन्सने हा करार रद्द केला.

रिटेल किंगचा प्रवास किशोर बियाणी यांना भारताचे रिटेल किंग म्हणून ओळखले जात होते. भारतातील किरकोळ बाजारात त्यांनी एकेकाळी तुफान आणले होते. त्यांच्या फ्युचर रिटेलने बिग बाजार, ईझीडे, फुडहॉल सारखे अनेक ब्रँड बाजारात उतरवले होते. 2007 पासून ते या समूहाशी जोडल्या गेले आहेत. हायपर मार्केट, सुपर मार्केट आणि होम सेगमेंटमध्ये त्यांनी जोरदार घोडदौड केली होती. फ्युचर रिटेल देशातील 430 शहरातील 1500 हून अधिक आऊटलेटच्या माध्यमातून व्यवसाय करत होती.

राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल.