मुकेश अंबानी यांच्या मित्राशीच बहिणीने केलं होतं लग्न; जाणून घ्या दिप्ती साळगावकरविषयी..

मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांना दोन बहिणीसुद्धा आहेत. नीना कोठारी आणि दिप्ती साळगावकर या त्यांच्या बहिणी आहेत. त्यापैकी सर्वांत छोटी बहीण दिप्ती यांनी मुकेश आणि अनिल यांच्या मित्राशीच लग्न केलं. सध्या त्या गोव्यात स्थायिक आहेत.

मुकेश अंबानी यांच्या मित्राशीच बहिणीने केलं होतं लग्न; जाणून घ्या दिप्ती साळगावकरविषयी..
मुकेश अंबानी यांच्या बहीण दिप्ती साळगावकरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 3:25 PM

मुंबई : 21 मार्च 2024 | जेव्हा कधी अंबानी कुटुंबाविषयी बोललं जातं, तेव्हा सर्वांत आधी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी ही दोन डोळ्यांसमोर येतात. मात्र या अंबानी भावंडांच्या दोन बहिणीसुद्धा आहेत. नीना कोठारी आणि दिप्ती साळगावकर अशी त्यांची नावं आहेत. दिप्ती साळगावकर या धीरुभाई अंबानी यांची सर्वांत लहान कन्या आणि मुकेश अंबानी यांची छोटी बहीण आहे. दिप्ती यांचा जन्म 23 जानेवारी 1962 रोजी झाला. त्यांनी व्ही. एम. साळगावकर कॉलेज ऑफ लॉमधून शिक्षण पूर्ण केलं. सध्या त्या गोव्यात राहतात. दिप्ती यांनी दत्तराज साळगावकर यांच्याशी लग्न केलं. दत्तराज हे मुकेश आणि अनिल अंबानी यांचे बालपणीचे मित्र आहेत. दिप्ती आणि दत्तराज यांना विक्रम हा मुलगा आणि इशेता ही मुलगी आहे.

अंबानी आणि साळगावकर कुटुंबीयांची जवळीक

1978 मध्ये धीरुभाई अंबानी आणि त्यांचं कुटुंब हे मुंबईतल्या ‘उषा किरण’ या मुंबईतल्या गगनचुंबी इमारतीत 22 व्या मजल्यावर राहायचे. तर बिझनेसमन वासुदेव साळगावकर आणि त्यांचं कुटुंब हे याच इमारतीच्या 14 व्या मजल्यावर राहत होते. त्यावेळी धीरुभाई आणि वासुदेव यांच्यात चांगली मैत्री झाली होती. वासुदेव साळगावकर यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा दत्तराज हे धीरुभाई यांनाच वडिलांसमान मानत होते. दत्तराज, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी हे सर्वजण एकाच वयोगटातील होते. त्यामुळे या तिघांमध्ये हळूहळू दृढ मैत्री होत गेली.

हे सुद्धा वाचा

दत्तराज आणि दिप्ती यांची मैत्री

साळगावकर आणि अंबानी कुटुंबीय यांच्यात मैत्रीपूर्ण नातेसंबंध असल्याने दिप्ती आणि दत्तराज यांचीही अनेकदा भेट व्हायची. या भेटीदरम्यानच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास पाच वर्षे एकमेकांच्या डेट केल्यानंतर दिप्ती आणि दत्तराज यांनी 31 डिसेंबर 1983 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ते गोव्यात स्थायिक झाले आणि तिथेच व्यवसाय करू लागले. दत्तराज साळगावकर यांनी गोव्याच्या संस्कृतीचं जनत करण्यासाठी सुनापरांताची स्थापना केली. दिप्ती या संस्थेच्या उपाध्यक्षा आणि सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.