AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ॲप्सवॉर सरुच: आणखी 54 ॲप्सवर बंदी, नव्या बंदीत चिनी ॲप्सचा समावेश

देशाच्या आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या ॲप्स विरोधातील सरकारची नेटाची भूमिका कायम आहे. 2020 पासून भारतात आधीच बंदी घातलेल्या ॲप्सच्या क्लोनचा सध्या बंदी घालण्यात आलेल्या यादीत समावेश आहे. सरकारने 50 ॲप्सवर वक्रदृष्टी फिरवल्याने बंदी घातलेल्या ॲप्सची संख्या 320 वर पोहचली आहे.

ॲप्सवॉर सरुच: आणखी 54 ॲप्सवर बंदी, नव्या बंदीत चिनी ॲप्सचा समावेश
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 12:34 PM
Share

मुंबई : देशाच्या आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या ॲप्स विरोधातील सरकारची नेटाची भूमिका कायम आहे. 2020 पासून भारतात आधीच बंदी घातलेल्या ॲप्सच्या क्लोनचा सध्या बंदी (apps clone ban) घालण्यात आलेल्या यादीत समावेश आहे. सरकारने 50 ॲप्सवर वक्रदृष्टी फिरवल्याने बंदी घातलेल्या ॲप्सची संख्या 320 वर पोहचली आहे.भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला (security, integrity) धोका असल्याचं कारण देत हे निर्बंध लादण्यात आले आहेत. 2020 पासून एकूण 270 ॲप्सवर बंदी घातल्यानंतर 2022 मध्ये सरकारने पहिल्यांदाच कारवाईचा बडगा उगारला आहे. न्यूज 18 ने ईटी नाऊच्या रिपोर्टचा हवाला देत म्हटले आहे की, सरकारने आणखी 50 ॲप्सवर बंदी घातली आहे. या ॲप्सवर आयटी कायद्याच्या (IT Act) कलम ६९ अ अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, गॅरेना फ्री फायर नावाचा लोकप्रिय स्मार्टफोन गेम याआधी गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप्स स्टोअरमधून गायब झाला होता आणि भारतात बंदी घातलेल्या ॲप्सच्या नव्या यादीत या गेमचा समावेश होऊ शकतो, असं समोर येत आहे.

बंदी घातलेल्या ॲप्सच्या क्लोनवर बंदी

या अहवालानुसार, बंदी घातलेल्या ॲप्सच्या नव्या यादीत 2020 पासून भारतात आधीच बंदी घालण्यात आलेल्या ॲप्सच्या क्लोनचा समावेश आहे. आणखी 50 बंदी घातलेल्या ॲप्समुळे भारताने बंदी घातलेल्या एकूण ॲप्सची यादी 320 च्या जवळपास पोहचली आहे.

या ॲप्सवर भारतात आधीच बंदी आहे.

सरकारने यापूर्वी टिकटॉक आणि पबजी मोबाईलसह अनेक लोकप्रिय ॲप्सवर बंदी घातली होती.परंतु, पबजी ॲपने कसेबसे भारतात पुनरागमन केले, तर क्राफ्टनने एक नवीन कार्यालय स्थापन केले आणि आपल्या चिनी भागीदारांशी संबंध तोडले, टिकटॉक मात्र या कामी इतके भाग्यवान ठरले नाही. देशांतर्गत त्यावरील बंदी कायम आहे. रिपोर्टनुसार, बंदी घालण्यात आलेल्या ॲप्सच्या नव्या यादीमध्ये क्लोन ॲप्सचा समावेश आहे, त्यात काही चीनी ॲप्सचा समावेश आहे.

2020 मध्ये पहिल्यांदा 59 ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती.

2020 मध्ये लडाखमध्ये सीमारेषेवरवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता, तेव्हा टिकटॉकसह 59 चिनी ॲप्सवर पहिल्यांदा बंदी घालण्यात आली होती. टिकटॉक, यूसी ब्राऊझर, शेअर इट, हेलो, लाइकी, वी चॅट, ब्युटी प्लस या लोकप्रिय ॲप्सवर भारताने बंदी घातली होती. यानंतर सरकारने 47 मोबाईल ॲप्सवर बंदी घातली, त्यातील बहुतांश ॲप्स एकतर आधीपासून बंदी घातलेल्या ॲप्सचे क्लोन होते अथवा त्यांच्यासारखे होते. यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये भारताने पबजी या लोकप्रिय गेमिंग ॲप्सह आणखी 118 मोबाईल ॲप्सवर बंदी घातली. पबजी व्यतिरिक्त लायविक, वीचॅट वर्क, वीचॅट रीडिंग, कॅरम फ्रेंड्स, कॅमकार्ड यासारख्या ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

Biggest Bank Fraud: अबब ! देशातील बँकांना 22 हजार 842 कोटी रुपयांचा चूना, एबीजी शिपयार्ड दिवाळीखोरीने 28 बँका गर्तेत

भारतातील सर्वात मोठा आयपीओ; केंद्र एलआयसीतील 5 टक्के समभागांची विक्री करणार

खुषखबर EPFO च्या 24 कोटी खातेदारांना सुखद धक्का, कर्मचा-यांच्या ठेवीवरील व्याजदरात सरकार वाढ करण्याची शक्यता

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.