मुकेश अंबानी यांनी अदानींच्या या कंपनीत गुंतवले पैसे, पहिल्यांदाच आले एकत्र

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत असलेले मुकेश अंबानी यांनी गौतम अदानी यांच्या कंपनीत पैसे गुंतवले आहेत. ही पहिलीच वेळ आहे की जेव्हा या दोन प्रतिस्पर्धी एकत्र आले आहेत. पाहा मुकेश अंबानी यांच्या कंपनीने अदानी यांच्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले आहे.

मुकेश अंबानी यांनी अदानींच्या या कंपनीत गुंतवले पैसे, पहिल्यांदाच आले एकत्र
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 9:03 PM

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांचाच प्रतिस्पर्धी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीत अदानी पॉवरचा २६ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. दोन प्रतिस्पर्धी अब्जाधीश उद्योगपतींमध्ये पहिल्यांदाच अशी डील झाली आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीजने प्लांटमधून 500 मेगावॅट वीज वापरण्यासाठी करार केला आहे.

शेअर बाजाराला दिलेल्या स्वतंत्र फायलींगमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, रिलायन्स अदानी पॉवर लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या महान एनर्जीन लिमिटेडमध्ये प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे (50 कोटी रुपये) दर्शनी मूल्याचे पाच कोटी इक्विटी शेअर्स आणि 500 ​​शेअर्स खरेदी करेल. ज्यामध्ये कंपनी त्यांची मेगावॅट उत्पादन क्षमता वापरेल.

गुजरातचे हे दोन उद्योगपती एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर येण्यासाठी दोघांमध्ये चुरस पाहायला मिळाली आहे.

मुकेश अंबानी यांची कंपनी तेल, वायूपासून ते किरकोळ वस्तू आणि दूरसंचार क्षेत्रात काम करत आहेत, तर अदानींचे लक्ष बंदरे ते विमानतळ, कोळसा आणि खाणकाम अशा पायाभूत सुविधांवर आहे. या दोन्ही उद्योगपतींनी या क्षेत्रात अनेक अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे.

अदानी समूहाला 2030 पर्यंत जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा उत्पादक बनायचे आहे. तर रिलायन्स गुजरातमधील जामनगरमध्ये चार गिगाफॅक्टरी बांधत आहे. यातील प्रत्येक कारखाना सौर पॅनेल, बॅटरी, ग्रीन हायड्रोजन आणि इंधन पेशींसाठी आहे.

अदानी समूह सौर मॉड्यूल्स, विंड टर्बाइन आणि हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स तयार करण्यासाठी तीन गिगाफॅक्टरी देखील उभारत आहे.

अदानी समूहाने पाचव्या पिढीचा (5G) डेटा आणि व्हॉइस कॉल सेवा वाहून नेण्यास सक्षम असलेल्या स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केला तेव्हाही संघर्षाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अंबानींच्या विपरीत, अदानीने 26 GHz बँडमध्ये 400 MHz स्पेक्ट्रम खरेदी केला होता, जो सार्वजनिक नेटवर्कसाठी नाही.

त्यामुळे दोघेही एकमेकांच्या विरोधात कधीच जात नाहीत. इतकंच नाही तर जामनगरमध्ये अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला गौतम अदानी हे देखील उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.