देशाच्या तिजोरीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडून किती भरली गेली रक्कम, मागील वर्षापेक्षा वाढ की घट?
Mukesh Ambani news: रिलायन्सकडून या आर्थिक वर्षांत 1.86 लाख कोटी रुपये कराच्या माध्यमातून राष्ट्रीय खजिन्यात जमा केले गेले आहे. रिलायन्सने सलग सहाव्या वर्षी राष्ट्रीय तिजोरीतील 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त दिले आहे. गेल्या सात वर्षात कंपनीकडून एकत्रित योगदान आता 10 लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे.

राष्ट्रीय तिजोरीत विविध कंपन्यांकडून भरणा होत असतो. विविध करांच्या माध्यमातून राष्ट्रीय खजिन्यात पैसे जमा होत असतात. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाने राष्ट्रीय तिजोरीत सन 2023-24 या आर्थिक वर्षात 1.86 लाख कोटी रुपये जमा केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा पैसे पाच टक्क्यांनी जास्त आहे. मागील वर्षी समुहाकडून 1.77 लाख कोटी रुपये राष्ट्रीय खजिन्यात जमा करण्यात आले होते. कंपनीच्या वार्षिक अहवालात यासंदर्भात माहिती दिली गेली आहे.
सलग सहा वर्ष गाठला हा टप्पा
रिलायन्सकडून या आर्थिक वर्षांत 1.86 लाख कोटी रुपये कराच्या माध्यमातून राष्ट्रीय खजिन्यात जमा केले गेले आहे. रिलायन्सने सलग सहाव्या वर्षी राष्ट्रीय तिजोरीतील 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त दिले आहे. गेल्या सात वर्षात कंपनीकडून एकत्रित योगदान आता 10 लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023- 24 मध्ये निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन 9.11 लाख कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षापेक्षा त्यात 10.26% जास्त वाढ आहे. मागील आर्थिक वर्षात 8.26 लाख कोटी कॉर्पोरेट कर होता.
रिलायन्सची संपत्ती वाढली
रिलायन्सच्या निव्वळ संपत्तीत या आर्थिक वर्षात चांगलीच वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल 11.1 टक्के आहे. रिलायन्सची संपत्ती 7.43 लाख कोटी झाली आहे. रिलायन्सच्या रिटेल, डिजिटल सेवा, O2C, आणि E&P यासह त्याच्या विविध व्यवसायाची कामगिरी चांगली झाली आहे. कंपनीचा नफा 7.3 टक्क्यांनी वाढून 79,020 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान, मुकेश अंबानी यांनी सलग चौथ्या वर्षी कंपनीकडून एक रुपयाही पगार घेतला नाही. जून 2020 म्हणजे कोरोना काळापासून मुकेश अंबानी पगार घेत नाही. 2008-09 ते 2019-2020 या दरम्यान त्यांचे वेतन 15 कोटी रुपये होते. मुकेश अंबानी यांच्या परिवाराकडे रिलायन्सचे 332.27 कोटी शेअर आहेत. हा वाटा 50.33 टक्के आहे.
