AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget2020: देशात 100 नवीन एअरपोर्ट, मुंबई ते दिल्ली 12 तासात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत अर्थसंकल्प 2020 सादर केला. यामध्ये देशातील महामार्ग आणि इकोनॉमिक कॉरिडोर तयार करण्यासाठी मोठ्या घोषणा (Mumbai to Delhi Express Highway) केल्या आहेत.

Budget2020: देशात 100 नवीन एअरपोर्ट, मुंबई ते दिल्ली 12 तासात
| Edited By: | Updated on: Feb 01, 2020 | 6:54 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत अर्थसंकल्प 2020 सादर केला. यामध्ये देशातील महामार्ग आणि इकोनॉमिक कॉरिडोर तयार करण्यासाठी मोठ्या घोषणा (Mumbai to Delhi Express Highway) केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी 2500 किलोमीटरचा एक्सप्रेस महामार्ग, 9 हजार किलोमीटरचा इकोनॉमिक कॉरिडोर आणि 2 हजार किलोमीटरचा स्ट्रॅटेजिक महामार्ग तयार करण्याची घोषणा (Mumbai to Delhi Express Highway) केली आहे.

100 नवीन एअरपोर्टची निर्मिती

सरकारने ट्रान्सपोर्ट आणि पायाभूत सुविधांसाठी एक लाख 70 हजार कोटींची तरतूद केली आहे. आपल्या समुद्र बंदरांना अजून दक्ष करण्याची गरज आहे. तसेच उडान योजनेतंर्गत 2024 पर्यंत 100 नवीन एअरपोर्टची निर्मिती केली जाणार आहे. अद्याप हे नवीन एअरपोर्ट कुठे-कुठे तयार केले जाणार हे अजून ठरेलेले नाही. पण मोठी आणि छोठी शहर जोडण्यासाठी तसेच पर्यटनाला प्राधान्य देण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात आले आहे.

प्रवेश नियंत्रण महामार्ग – 2500 किलोमीटर इकोनॉमिक कॉरीडोर – 9000 किलोमीटर कोस्टल आणि लँड पोर्ट रोड – 2000 किलोमीटर स्ट्रॅटेजिक रोड – 2000 किलोमीटर

प्रमुख महामार्गांचा इतिहास

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस महामार्गाशिवाय दोन इतर पॅकेज 2023 पर्यंत पूर्ण होणार आहेत. यासोबत चेन्नई-बंगळुरु एक्सप्रेस महामार्गाची सुरुवात होणार आहे. 6000 किलोमीटरपेक्षा अधिक लांब असणाऱ्या 12 महामार्गांच्या मुद्रीकरणचा प्रस्ताव आहे.

सरकार 6000 किलोमीटरचे महामार्ग 2024 पर्यंत तयार करणार आहेत. जगातील सर्वात मोठा दिल्ली-मुंबई महामार्गवर काम सुरु झाले आहे. यासाठी एक लाख तीन हजार कोटींचा खर्चा आहे. आजपासून पुढील तीन वर्षांच्या आत दिल्लीची जनता आपल्या गाडीने 12 तासात मुंबई पोहोचू शकणार आहेत.

यापूर्वी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही दिल्लीमधील एका पत्रकार परिषदेत दिल्ली-मुंबई रस्त्याच्या महामार्गाबद्दल सांगितले होते. ते म्हटले होते की, तीन वर्षाच्या आता हा महामार्ग तयार होईल.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.