AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजपासून ‘हे’ मोठे बदल!, तुमच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता

आजपासून आपल्या दैनंदिनीत काही महत्वाचे बदल होत आहेत. ज्याचा परिणाम आपल्या महिन्याच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे. एलपीजी गॅस सिलेंडरपासून ते गृह कर्जावरील व्याजदरात बदल होणार आहे.

आजपासून 'हे' मोठे बदल!, तुमच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता
| Updated on: Nov 01, 2020 | 9:11 AM
Share

नवी दिल्ली: आज 1 नोव्हेंबरपासून नव्या महिन्याला सुरुवात होत आहे. आजपासून आपल्या दैनंदिनीत काही महत्वाचे बदल होत आहेत. ज्याचा परिणाम आपल्या महिन्याच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे. एलपीजी गॅस सिलेंडरपासून ते गृह कर्जावरील व्याजदरात बदल होणार आहे. त्याचबरोबर आज केरळमध्ये भाजीपाल्यालाही किमान आधारभूत किंमत अर्थात MSP लागू होणार आहे. (Big economical changes in our life from today)

गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल नाही

सरकार तेल कंपन्या महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅसची किंमत ठरवत असतात. पण सणवारांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींना दिलासा दिला आहे. आज घरगुती गॅस अर्थाल एलपीजी गॅसची किमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. पण उद्योग-व्यवसायांसाठी लागणाऱ्या गॅसची किमतीत मात्र वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसायांसाठी लागणाऱ्या 19 किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत आता 1 हजार 241 रुपये 50 पैसे झाली आहे.

गॅस सिलेंडरच्या होम डिलिव्हरी नियमात बदल

आजपासून LPG गॅस सिलिंडर होम डिलिव्हरीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. आजपासून DAC अर्थात डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड लागू करण्यात आला आहे. याचा अर्थ ग्राहकांच्या मोबाईलवर एक OTP पाठवण्यात येईल. गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीदरम्यान हा OTP सांगावा लागणार आहे. त्यानंतर गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार आहे.

SBI च्या बचत खात्यांवर व्याज कमी मिळणार

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBIच्या बचत खात्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. SBI बँकेने १ लाख रुपयांच्या ठेवीवरील व्याजदरात 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे.

केरळमध्ये भाजीपाल्याला किमान आधारभूत किंमत!

केरळ सरकार शेती क्षेत्रात एक मोठं पाऊल उचलत आहे. आज केरळमध्ये भाजीपाल्याला किमान आधारभूत किंमत अर्थात MSP लागू होणार आहे. त्यामुळे केरळमध्ये भाजीपाल्याला लागवडीच्या खर्चाच्या कमीत कमी 20 टक्के अधिक MSP मिळणार आहे.

Bank of Barodaचे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त

देशातील तिसरी मोठी सरकारी बँक असलेल्या Bank of Barodaने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. रेपो रेटच्या तुलनेत Bank of Barodaने व्याज दर 7 टक्क्यांवरुन 6.85 टक्के केले आहे. त्यामुळे गृह, वाहन, मॉर्टगेज, शिक्षण आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे.

संबंधित बातम्या:

मोदी सरकारला जाहिरातीची भारीच हौस, एका वर्षात तब्बल 713 कोटींचा खर्च

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! नोव्हेंबरमध्ये ‘एवढे’ दिवस बँका बंद; जाणून घ्या…

Big economical changes in our life from today

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.