पेटीएमकडून क्रेडिट कार्ड लाँच, महिन्याला एक लाखाची मर्यादा

पेटीएमकडून क्रेडिट कार्ड लाँच, महिन्याला एक लाखाची मर्यादा

मुंबई : डिजिटल व्यवहारातील अग्रगण्य कंपनी पेटीएमने आता क्रेडिट कार्ड लाँच केलं आहे. पेटीएमने सिटी बँकसोबत हे कार्ड लाँच केलं आहे आणि याला ‘पेटीएम फर्स्ट कार्ड’ नाव दिलं आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने एक टक्के कॅशबॅक अनलिमिटेड ऑफरही दिली आहे.

पेटीएम फर्स्ट कार्डसाठी ग्राहकांना वर्षाला 500 रुपये भरावे लागणार. पण जर तुम्ही 50 हजारपेक्षा अधिक खर्च केले, तर ही फी तुमच्यासाठी माफ केली जाईल. कार्डची मर्यादा प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये असेल. यामुळे अनेकांना शॉपिंगसाठी याचा फायदा होईल.

ग्राहाकांना प्रत्येक व्यवहारावर एक टक्के कॅशबॅक ऑफर मिळेल. ही ऑफर प्रत्येक महिन्याला ग्राहकांच्या खात्यात ऑटोमेटिक जमा होईल. पेटीएमने सप्टेंबर 2017 मध्ये डेबिट कार्ड लाँच केलं होते. पेटीएम अॅपवरुन तुम्ही फर्स्ट गार्डसाठी अप्लाय करु शकता, असं कंपनी म्हणाली.

सध्याच्या डिजिटल युगात मोठ्या प्रमाणात लोक डिजिटल व्यवहार करतात. यामध्ये सर्वाधिक क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. याच पार्श्वभूमिवर कंपनीने क्रेडिट कार्ड लाँच केल्याची चर्चा सुरु आहे.

Published On - 9:47 pm, Tue, 14 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI