Petrol, diesel prices : आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

आज पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे 76 पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये इंधनाच्या किमतीमध्ये तीनवेळा वाढ झाली आहे.

Petrol, diesel prices : आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 8:13 AM

नवी दिल्ली : आज पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे 76 पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. चालू आठवड्यात मंगळवारी प्रथमच इंधनाच्या (Fuel)किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. तर गुरुवारी पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर होत्या. शुक्रवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.81 रुपये तर डिझेलचा दर 89.07 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रल 112.51 तर डिझेल 96.70 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे प्रति लिटर दर अनुक्रमे 103.67 आणि 93.71 रुपये लिटर आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोल 107.18 आणि डिझेल 92.22 रुपये प्रति लिटर आहे. चार नोव्हेंबर 2021 नंतर 22 मार्च 2022 ला प्रथमच पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या चार दिवसांमध्ये तीन वेळा दरवाढ झाली आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

आज पेट्रोलमध्ये प्रति लिटर 76 पैशांनी तर डिझेलमध्ये प्रति लिटर 84 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 112.51 तर डिझेल 96.70 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 113.32 आणि डिझेल 97.50 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 111.76 तर डिझेल 94.55 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 111.37 आणि 94.15 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 111.53 रुपये लिटर आणि डिझेल 94.33 रुपये लिटर इतके आहे.

या राज्यात पेट्रोल 100 रुपयांपेक्षा अधिक महाग

गेल्या चार दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सलग तीन वेळा वाढ झाली आहे. 22 मार्चनंतर केवळ 24 मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत.

संबंधित बातम्या

भविष्यात पेट्रोल, डिझेल आणखी महागणार ; पेट्रोलियम कंपन्यांना तीन महिन्यात 19 हजार कोटी रुपयांचा तोटा

चालू आर्थिक वर्षात 2.26 कोटी करदात्यांना मिळाला Tax Refund, घरी बसल्या ‘असे’ चेक करा आपल्या आयकर परताव्याचे स्टेटस

मारुती सुझुकीला मिळाले नवीन सीईओ; हिसाशी ताकेऊची एप्रिलपासून पदभार स्विकारणार, तीन वर्षासाठी नियुक्ती

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.