मिठाई सणाचा गोडवा कमी करणार; सर्वसामान्यांना बसणार मोठी आर्थिक झळ

येणाऱ्या नवरात्र, दसरा आणि दिवाळीत दुधापासून तयार होणारी मिठाई महाग होण्याची शक्यता आहे. एकीकडे जनावरांना (Cattle) होत असलेल्या आजारामुळे दूध उत्पादन घटत आहे. तर दुसरीकडे चारा महाग (inflation) होत असल्यानं दूध (milk) स्वस्त होण्याऐवजी महागच होण्याची शक्यता आहे.

मिठाई सणाचा गोडवा कमी करणार; सर्वसामान्यांना बसणार मोठी आर्थिक झळ
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 3:51 PM

मुंबई : येणाऱ्या नवरात्र, दसरा आणि दिवाळीत दुधापासून तयार होणारी मिठाई महाग होण्याची शक्यता आहे. एकीकडे जनावरांना (Cattle) होत असलेल्या आजारामुळे दूध उत्पादन घटत आहे. तर दुसरीकडे चारा महाग (inflation) होत असल्यानं दूध (milk) स्वस्त होण्याऐवजी महागच होण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख दूध उत्पादक राज्यांमधील दुधाळ जनावरांमध्ये लंपी स्किन आजाराचा फैलाव झालाय.आणि त्याच कारणामुळे दूध उत्पादनाला फटका बसलाय.गुजरात आणि राजस्थाननंतर आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही लम्पी स्किनचा फैलाव होतोय. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही दोन राज्य दूध उत्पादनात आघाडीवर आहेत. मात्र लम्पी स्किन आजारामुळे या राज्यांमध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झालाय.

लंपी क्रिनचा वेगाने फैलाव

एकट्या राजस्थानमध्ये दहा हजारांहून अधिक जनावरं मृत्युमुखी पडले आहेत. गुजरातमध्ये पाच हजार जनावरांचा मृत्यू झालाय.दुधाळ जनावरांमध्ये लंपी स्किन आजाराचा फैलाव झाल्यानंतर दुधात 60 टक्के घट होते.लंपी स्किन आजारातून बरे झालेल्या जनावरांचं दूध उत्पादन त्याच स्तरावर येण्यासाठी वेळ लागतो.याच कारणांमुळे दूध उत्पादन प्रभावित होत आहे.दुध उत्पादन कमी झाल्यामुळे डेअरीच्या दूध संकलनातही घट झाली आहे.

अनेक ठिकाणी दूध संकलनात चार ते पाच टक्क्यांनी घट झाली आहे.कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाल्यानं दूध संकलन घटलंय.गेल्या वर्षी कोरोनामुळे संघटित क्षेत्रातील डेअरींकडेच दूधाचा पुरवठा होत होता. यंदा परिस्थिती सामान्य झाल्यानं असंघटित क्षेत्राकडेही दुधाचा पुरवठा वाढू लागला आहे.

हे सुद्धा वाचा

चाऱ्याचे दर वाढले

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चाऱ्याचे दरही 15 ते 17 टक्क्यांनी वाढले आहेत. म्हणजेच दुध उत्पादकांच्या पशुखाद्याच्या दरात वाढ होणार आहे. मात्र दुसरीकडे दुधाच्या दरात म्हणावी तितकी वाढ झालेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत दुधाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. दूध उत्पादनाचा खर्च आणि बाजारातील मागणीची परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांत दुधाच्या दरात जरी वाढ झाली नाही, तरी किंमती कमी होण्याची शक्यता बिलकूल नाही अशी माहिती अमूल डेअरीचे एमडी आर.एस. लोढी यांनी दिली आहे.

मिठाई महागणार

दुध उत्पादनाचा खर्च वाढल्यामुळेच गेल्या महिन्यात दुध कंपन्यांनी दुधाच्या किंमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली होती. आता लंपी स्किन आजारामुळे दुध उत्पादन घटल्यानं पुन्हा एकदा दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे. दूध हा मिठाईतील प्रमुख घटक असल्यानं येत्या काळात मिठाईचे दर देखील वाढणार आहेत.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.